भंडारा :
जेवण वाढणारयाला मारहाण ; लग्न कार्यात दहीची कढी हा पदार्थ कायमचा एक नंबर वर असलेला पदार्थ आहे. त्याशिवाय जेवणाच्या पंगतीची शोभाच वाढत नाही. कढी लोकांच्या इतकी जिव्हाळ्याची आहे की तिला काही ठिकाणी सुंदरीही म्हणतात. मात्र, या कढी प्रेमापायी लग्नसमारंभात हाणामारी झाली व प्रकरण चक्क ठाण्यापर्यंत पोहोचले. लग्न मंडप पूजन कार्यक्रमाच्या पंगतीत भोजन करताना कढी संपल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले.जेवण वाढणारयाला कढी संपली असे सांगितल्याने मारहाण केल्याची घटना घडली. सादर गुन्ह्या विषयी परस्परांविरुद्ध कारधा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
जेवण वाढणारयाला मारहाण
आशिष रवींद्र वंजारी (२६, रा. टेकेपार पुर्नवसन ता. भंडारा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो रविवारी आपले चुलत काका अशोक वंजारी यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात गेला होता. मंडप पूजनाच्या पंगतीत तो जेवण करायला बसला. त्यावेळी त्याने वाढणाऱ्या मुलांना कढी संपली असे सांगितले. त्यावरून एवढ्या जोराने कशाला ओरडता असे म्हणत कार्तिक तेजराम वंजारी याने वाद घातला. मी म्हणणार.. कशी संपली कढी म्हणत त्यांच्यात जुंपली. या वादात कार्तिक व त्याचे वडील तेजराम गोविंदा वंजारी या दोघांनी काठीने आशिषला चांगलीच मारहाण केली. याप्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार साठवणे करीत आहे. स्नेहा कार्तिक वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष वंजारी याच्या विरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार साठवणे करीत आहे
1 comment
7yueh2mi