Home » Nanabhau Patole : कॉंग्रेस पक्षाचे राज्याचे नेतृत्व करत असलो तरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची माझी जबाबदारी, नानाभाऊ पटोले

Nanabhau Patole : कॉंग्रेस पक्षाचे राज्याचे नेतृत्व करत असलो तरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची माझी जबाबदारी, नानाभाऊ पटोले

by vmnews24
351 views

साकोली:

Nanabhau Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्या जिल्ह्यात विशेषतः स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामांचा धडाका सुरू केलेला आहे. सुदैवाने या सरकारमध्ये पहिल्या वर्षी त्यांना राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मतदार संघात साकोली येथे विस्तारित उपजिल्हा रुग्णालय, विविध गावांना जोडणारे रस्ते, पूल अशी अत्यंत महत्त्वाची कामे त्यांनी हाती घेतली आणि ती पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू केले आहेत.

Nanabhau Patole :  50 कोटी रुपयांच्या नवीन विकास कामांना मंजुरी

साकोली बोदरा राज्य मार्गाला जोडणारा खैरी आमगाव खुर्द घानोड आमगांव कला रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरण. तूडमापुरी पाथरी सेंदुरवाफा गडकुंभली धर्मापुरी मोहघाटा ते रा. म. मा. ६ पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण.  राज्य महामार्ग सहापासून जांभळी नीलागोंदी मोरगाव ते राज्यमहामार्ग 360 पर्यंत डांबरीकरण व नूतनीकरण. मुंडीपार बाम्हणी सराटी चिचगाव गुढरीटोला नीलागोंदी किन्ही डांबरीकरण व नूतनीकरण. मुंडीपार बरडकिन्ही गिरोला सावरबंध ते साकोली लाखांदूर राज्य महामार्गाला जोडणारा रस्त्याचे सिमेंटीकरण. 

रेंगेपार गोंडसावरी परसोडी केसलवाडा खुर्शिपार पळसपाणी ते राज्य महामार्ग 356 ला जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. पळसगाव बोळदे सालई भिवखिडकी रस्ता डांबरीकरण व नूतनीकरण.  गोंडसावरी खेडेपार लाखनी चान्ना मलकाझरी खुर्सीपार रस्ता डांबरीकरण व नूतनीकरण. राज्य महामार्ग 6 पासून ते पिंपळगाव खैरी सामेवाडा राजेगाव ते मोरगाव ची नदी पार केसलवाडा खुर्सीपार उसगाव ते राज्य महामार्ग 356 ला जोडणारा मार्ग डांबरीकरण व नूतनीकरण.

या कामांसह एकोडी करडी बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर अतिरिक्त सुटलेल्या नवीन रस्ता साठी 15 कोटी रुपये आणि लाखांदूर येथे विश्रामगृहासाठी अडीच कोटी रुपये अशा पद्धतीने जवळपास साकोली विधानसभा मतदारसंघातील एकूण 50 कोटी रुपयांच्या नवीन विकास कामांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली आहे.

Nanabhau Patole :  मतदार संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न

विकासाची ही घोडदौड कायम ठेवण्याचा माझा मानस आहे.  माझा मतदारसंघ हा राज्यातला एक आदर्श मतदारसंघ राहिला पाहिजे ज्यामध्ये भौतिक सोयी सुविधांसह सर्व गोष्टी उपलब्ध करून देता येईल असा माझा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाची राज्याच्या प्रमुख पदाची धुरा सांभाळत असलो तरी मतदार संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सांगितले.

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More