@amit_rangari.com
Police Inspector Nitin Chincholkar : होळी आणि हत्या यांचा परस्पर संबंध राहिलेल्या तुमसर शहराचा इतिहास घडलेल्या थरारक घटनांमधून सर्वांच्या स्मरणात राहतेच. मात्र २०२२ ची ही होळी तुमसर करीता काहीशी वेगळी ठरली आहे. शहरभरात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही असे पूर्वनियोजन करून पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी आपल्या कर्तव्य दक्षतेची पुन्हा ओळख पटवून दिली आहे. शहरात साधे भांडण आणि टोळी टोळीत उठणारे तणाव याचे परिणाम लक्षात घेऊन अनेकांना तात्पुरते हद्दपार होण्याची ताकिद, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा गाव निकाला, आणि संवेदनशील भागात स्वतः पोट्रोलिंग करून चिंचोळकर यांनी तुमसर शहराला सुरक्षित होळीची अनुभूती करून दिली आहे. त्यामुळे आपल्या टीमसह पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर हे तुमसरचे हिरो ठरले आहेत. ज्याची चर्चा संपूर्ण शहरभर केली जात आहे.
Police Inspector Nitin Chincholkar : अनेक हत्येच्या घटनांनी रंगलेला काळा इतिहास
तुमसर शहर संक्रात, पोळा आणि होळी ह्या सणांमध्ये अनेक हत्येच्या घटनांनी रंगलेला काळा इतिहास दर्शवतो. त्यात गँग वॉर, जुने वैमनस्य, शाब्दिक वाद, वर्चस्व वाद, शुल्लक वाद यातून अनेकांनी ह्याच सणांच्या दिवशी आपले जीव गमावले आहेत. मात्र ही होळी अश्या गंभीर तथा छोट्या घटना विरहित मावळल्याने तुमसर पोलिसांच्या कामांचे कौतुक सर्वत्र केले जात आहे. त्या करीता पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी सज्ज केलेली विविध चमू, आणि सतत पेट्रोलिंग करणारे पथक यांच्या प्रयत्नातून तुमसर शहरात एकही घटना तोंड वर करू शकलेली नाही. त्यात गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या सर्व समाज कंठकांना होळी आधीच गाव बाहेर निघून जाण्याची दिलेली ताकिद कामाची ठरल्याचे चिंचोळकर यांनी सांगितले आहे. याकरिता पोलीस उप विभागीय अधिकारी संतोषसिंह बिसेन यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
Police Inspector Nitin Chincholkar : ३३ हजारांचा दंड, तर अर्धनग्न फिरणाऱ्यांना चोप
होळीच्या नादात शहरभर दुचाकीचा धुरळा, त्यात वाहतुकीचे नियम मोडून क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसवून धावणाऱ्यांवर तुमसर पोलीसांनी कारवाही करून तब्बल ३३ हजारांचा दंड शासकीय कोष्यात जमा केला असल्याची माहिती चिंचोळकर यांनी दिली आहे. त्यात दुचाकी वरून अर्धनग्न होऊन फिरणाऱ्या दुचाकीस्वार युवकांच्या टोळींना पोलीस निरीक्षकांना चांगलाच चोप दिला आहे. तर शहरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या १० जणांवर कारवाही देखील केल्याची माहिती तुमसर पोलिसांनी दिली आहे. होळीच्या दिवशी शहरातील पोलीस बंदोबस्त आणि त्यांच्या सहकार्याला उपस्थित होमगार्ड यांनी पार पडलेले कर्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
व्हिडिओ फोनवरून तडीपारीतील अरोपितांशी संपर्क
होळीचा रेकॉर्ड शहराकरिता कधीच चांगला राहिलेला नाही. रक्तपात आणि गंभीर घटना यातून जन सामान्यांना त्याची धास्ती, यावर उपाय म्हणून चिंचोळकर यांनी गुन्हेगारी तक्ता असलेल्या अनेकांना शहराच्या हद्दीतून तात्पुरते बाहेर केले. तर पूर्वीचे हद्दपारीची शिक्षा भोगणाऱ्या सर्वांशी चक्क व्हिडिओ फोन वरून संपर्कात राहून त्यांची लोकेशन घेणे, बाहेर असल्याचे पुरावे म्हणून लोकेशनसह फोटो पाठविण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी ठरल्याची माहिती चिंचोळकर यांनी दिली आहे. त्यामुळेच शहराने सुरक्षित होळी अनुभवली आहे.