Home » Atrocity against Medical Officer : आदिवासी कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण!

Atrocity against Medical Officer : आदिवासी कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण!

by vmnews24
374 views
Atrocity-against-Medical-Officer

तुमसर : @Amit_rangari.com

Atrocity against Medical Officer : आदिवासी जाती जमाती जन समुदायावर अत्याचाराच्या घटना गोबरवाही क्षेत्रात काही नवीन नाही. मात्र विनाकारण आपल्या अधिनिस्त कर्मचाऱ्याला आवेशात जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करणे गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे. लाथाबुक्क्यांसह काठीने अमानुष मारहाण केल्याची चित्रफीत व्हायरल झाल्याने सदर प्रकार उघडकीस आले आहे. २२ मार्च रोजी घडलेल्या सदर प्रकरणात पीडित कर्मचारी नारायण उईके(५४) यांच्या तक्रारीवरून वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर(३०) याच्या विरुद्ध अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संतोषसिंह बिसेन यांनी दिली आहे. मात्र आरोपी डॉक्टरला अटक केली अथवा नाही याबाबत वृत्त लिहेपर्यंत पोलीसांनी माहिती दिलेली नाही.

Atrocity against Medical Officer : चित्रफीत सर्वत्र व्हायरल

तुमसर तालुक्यातील गोबरवाही क्षेत्र सध्या अनेक प्रकरणामुळे गाजत आहे. त्यात भर टाकत आदिवासी भावना भडकविणारी घटना २२ मार्च रोजी घडल्याची चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाली आहे. त्या चित्रफितीत स्थानिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी परीचराला अमानुषपणे मारझोड करत असल्याचे दिसत आहे. याची दखल प्रसार माध्यमांनी घेताच यंत्रणा खळबळून जागी झाली. अन् आरोपी डॉक्टर सागर कळसकर विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दखल करण्यात आला. तशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र चित्रफितीची तीव्रता बघता पीडित नारायण उईके याच्यावर काठी, लाथाबुक्क्यांचा मार आरोपी अधिकाऱ्याची विकृत मानसिकता दर्शविणारा भासत आहे. परंतु आरोपी डॉक्टरने पीडितला मारझोड का केली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

**पीडितने मांडली आपबिती

गोबरवाही येथील आरोग्य केंद्रात पीडित नारायण हा परिचर पदावर कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी तो नित्यप्रमाणे रात्रपाळीत कर्तव्यावर हजर होता. मात्र विनाकारण संतापलेल्या आरोपी डॉक्टरने नारायणवर लाठीने, लाथाबुक्क्यांनी आत्मघाती हल्ला चढवला. सदर प्रकार २२ मार्चच्या रात्री ७:३० च्या दरम्यान घडला त्यात उपस्थित एकाने त्याची चित्रफीत बनवली. सदर चित्रफितीत आरोपी डॉक्टर एका परिचारिकासमोर पीडितला जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबद्दलची आपबिती पीडित नारायणने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितली.

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More