Home » Atrocity law fails :वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर ला अंतरिम जामीन मंजूर

Atrocity law fails :वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर ला अंतरिम जामीन मंजूर

by vmnews24
249 views
Atrocity-law-fails

अट्रोसिटी कायदा अनुसूचित जाती व जमाती वरील अन्याय रोखण्यात पयशी ?

तुमसर :

Atrocity law fails : संविधानिक यंत्रणा, व्यक्ती स्वातंत्र्य आणि नैतिक मूल्यांच्या आधार कुणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी देत नाही. तसे झाल्यास शिक्षेची तरतूद सुव्यवस्था साधण्याची मध्यस्ती ही पोलिसांमार्फत केली जाते. गोबरवाही येथील आरोग्य केंद्रातील मोबाईल मध्ये कैद चित्रफितीतून व्हायरल झालेल्या आदिवासी कर्मचाऱ्याच्या मारझोडीचा प्रकार आरोपी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अटकेनंतर शांत झाला आहे. मात्र अँट्रोसिटी कायद्यातून (Atrocity law) कारवाही अंती अमानुष मारझोड करणाऱ्या डॉक्टर सागर कळसकर (३०) याला अंतरिम जामीनही मंजूर झाला. सदर माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संतोषसिंह बिसेन यांनी दिली आहे. त्यात तालुक्याचे आरोग्य विभाग सदर प्रकरणाला कसे हाताळणार यावर आता लक्ष लागून आहे.

Atrocity law fails अट्रोसिटी कायद्याच्या चौकटीत गुन्ह्याची नोंद

तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ मार्चच्या रात्री नारायण उईके ह्या आदिवासी परिचराशी घडलेला प्रकार चित्रफितीतून चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी असलेल्या आरोपी डॉक्टर कळसकर याने पीडितला काठीसह लाथा-बुक्क्यांनी बेदम  मारझोड केली होती. त्याबाबतची तक्रार स्थानिक पोलिसांत गुरुवारला होताच कारवाही अंती त्या अरोपितास अटक करण्यात आली. घटना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या चौकटीत मोडून गुन्ह्याची नोंद पोलिसांनी घेतली. तर आरोपी डॉक्टरला अंतरिम जामीनही मंजूर झाला आहे. मात्र आता तालुका आरोग्य विभागाच्या चौकशीवर सर्वांच्या नजरा लागून आहेत.

Read Also : https://twitter.com/VMNEWS2/status/1506961056702222341…

Atrocity law fails गोबरवाही क्षेत्र अश्या घटनांनी भरगच्च भरलेले!

कायदा व सुव्यवस्थेचा दिखावा आणि वास्तविकता यात फरक तो असतोच. घनता हत्येची असो की आदिवासी जन समुदायावरील अत्याचाराचे असो, अश्या असंख्य घटनांनी गोबरवाही क्षेत्र भरलेले आहे. त्यातील काही थरारक घटना स्मरणात येताच स्थानिकांच्या अंगावर आजही काटा येतो. नुकत्याच घडलेल्या अमानुष घटने व्यतिरिक्त ९ एप्रिल २०१८ रोजी गोबरवाही येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीशी केलेल्या अश्लील चाळ्याचे प्रकरण तेव्हा चांगलेच तापले होते. त्यात चिखला मॉईल येथे ३ जानेवारी २०१९ रोजी आदिवासी समावेश असलेल्या १२ युवकांना अर्धनग्न करून मारझोड केल्याचे प्रकरण देश पातळीवर गाजले होते. तर अंधश्रद्धा आणि जादूटोणा यातून ८ ऑगस्ट २०२० रोजी याच क्षेत्रातील राजापूर येथे चार इसमांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न अंगावर काटा आणणारा ठरला होता. त्यातच नारायण उईकेला डॉक्टरने केलेली अमानुष मारझोड आदिवासी अत्याचाराच्या (Atrocity law) त्याच कक्षेत मोडते, हे मात्र खरे!

https://vmnews24.com/…/24/atrocity-against-medical-officer

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More