Dr. Parinay Fuke MLA : राज्य शासनाने विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे, यासाठी आज विधानसभेत 260 अन्वये विविध मुद्दे उपस्थित करुन भूमिका मांडली.
नियमानुसार हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येते. कोविड महामारी मुळे मागील नागपूर ला अधिवेशन झाले नाही आणि आता कोविड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरही अधिवेशन नागपूरला होत नाही, हे विदर्भ कराराचे उल्लंघन आहे. विदर्भात आज अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत. यासाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. भांडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधी देऊन काम झाले असते, तर १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असते व विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास झाला असता. त्यासोबतच अनेक तलाव आज गाळ स्वच्छ न झाल्यामुळे दूषित आहेत. शिवाय गोड्या पाण्यात मासेमारी करणाऱ्या बांधवांसाठी कुठलीही योजना नाही व वैज्ञानिक विकास महामंडळाला उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी यांनी आश्वासन देऊनसुद्धा दोन वर्षांपासून मुदतवाढ नाही, याकडेही सभागृहाचे लक्ष वेधले.
Dr. Parinay Fuke MLA : आ. डॉ. परिणय फुके यांच्या प्रश्नाला आ. प्रविण दरेकर यांचे समर्थन
आघाडी सरकार ने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खोटी वचनं दिली . आम्विही सत्रोतेत असतांना व तुम्ही विरोधी पक्षात असताना तुम्ही कोरडवाहू जमीनधारकांना प्रति हेक्टरी २५ हजार तर बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये देण्याचे वचन शेतात जाऊन, बांधावर उभे राहून दिले. हे तुम्ही तुमच्या वचननाम्यात देखील छापले, सरकार ने हे वचन पाळले नाही.
भंडारा जिल्शेह्तयातील शेतकऱ्यांना तात्काळ पैसे दिले गेले नाहीत आणि काही शेतकऱ्यांना पूर्ण पैसे अद्याप मिळालेले नाहीत. दुष्काळ, अतीवृष्टी अशा नैसर्गिक संकटांच्या वेळी शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचे? असा उदगिन्न प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.