Home » Bicycle parade : सायकल परेड च्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश तर अवैध रेती व मुरूम उत्खानातून कोणता संदेश ?

Bicycle parade : सायकल परेड च्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश तर अवैध रेती व मुरूम उत्खानातून कोणता संदेश ?

by vmnews24
263 views
Bicycle-parade

*जिल्हाधिकाऱ्यांच्या निसर्ग संवर्धनात नद्यांची उपेक्षा ! महसूल अधिकारी अवैध रेती व मुरूम उत्खानात लिप्त*

Bicycle parade : माझा आणि आपला ह्या शब्दातील आपुलकीचा नेमका फरक देशाच्या प्रतिज्ञेतील अपलीच्या ओळीतून स्पष्ट अनुभवता येतो. हाच भाव जिल्हा प्रशासन येत्या २९ मार्च रोजी निसर्ग संवर्धन आणि राष्ट्रप्रेमाचे संदेश देणाऱ्या महा सायकल रैलीतून (Bicycle parade) जोपासण्याचे केविलवाणे प्रयत्न करणार आहे. राष्ट्रप्रेमाचे ठीक; मात्र निसर्गाचे नेमके कोणते संवर्धन आणि माझी वसुंधरेचा कोणता उदांत हेतू जिल्हाधिकारी साध्य करू पाहत आहेत, याचेच मोठे आश्चर्य! जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या होणाऱ्या उपेक्षेतून नदीपात्रांची झालेली आणि होत असलेली अधोगती संवर्धनाच्या कक्षेत मोडत नाही काय? तसे नसल्यास वसूंधरेचे संवर्धन फक्त दिखावा करून वृक्षलागवड आणि दिनविशेषाला पाण्याची बचत करणे इतकेच काय? याची समीक्षा येत्या काळात निसर्ग प्रेमी नक्कीच करणार, हे मात्र विशेष! परंतु  त्या समिक्षेतून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकारी यांच्याकडे नसणार ही वास्तविकता रेती तस्करितून होत असलेल्या निसर्गाच्या खुल्या लुटमारीतून दिसून येत आहे.

Bicycle parade : जिल्हा प्रशासन सायकल परेडच्या जय्यत तयारीला

जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यम तथा जाहिरातीच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन व राष्ट्रप्रेमाचा संदेश देणाऱ्या सायकल परेडच्या (Bicycle parade) जय्यत तयारीला लागले आहे. निसर्गाशी मानवी नाते घट्ट व्हावे या उद्देशाने २९ मार्चला भंडारा येथे ७ किमी लांबीचा मार्गक्रमण केला जाणार आहे. परंतु यातून निसर्ग संवर्धन नेमके कसे साध्य होणार हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे. एकीकडे वृक्षलागवड तर दुसरीकडे रस्त्याचे जाळे पासरवितांना हजारो वृक्षांची कत्तल, त्यात जिल्ह्याभरात नदी पात्रातून रेतीची अवैध तस्करी यातून खालावत जाणारी भूजल पातळी याला जबाबदार कोण? निसर्गाचा समतोल राखणाऱ्या नद्या शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यात तुमसर-मोहाडी सह नदी पात्र लाभलेल्या जिल्ह्यातील इतर तालुक्यातही वाळू माफियांचे फोफावलेले जाळे आणि प्रशासनाची संशयास्पद भूमिका चर्चेत असताना माझी वसुंधरा कशी सुजलाम सुफलाम होणार याचेच नवल !

लंकेची पार्वती झालेल्या जिल्ह्याला माझी वसुंधरेचे ठीगळ

जिल्ह्यात रेती चोरीचे ताणलेले राजकीय प्रकरण आणि असमाधानकारक कारवाह्या यामुळे  निसर्गाच्या र्‍हासास प्रशासनच कुठेतरी जबाबदार भासत आहे. पर्यावरणाचा समतोल राखणारी नदी आणि त्यातील नैसर्गिक संपत्तीची गेल्या काही वर्षात झालेल्या अतोनात लूटमारीने भंडारा जिल्ह्याला लंकेची पार्वती करून ठेवले आहे. सधन जिल्ह्याला लागलेली माफियांची किळ प्रशासनामार्फत माझी वसुंधरा या संकल्पनेचे ठिगळ लावून जोपासण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जात आहे. येथे सायकल परेडसह माफियांवर कारवाही करून निसर्ग संवर्धन व राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्याची नेमकी गरज आहे. त्यातून शासकीय यंत्रणेवरील निसर्ग प्रेमींनी आस्था पुन्हा स्थापित होण्यास सहायक ठरेल.

२३ नद्यांच्या अपेक्षित संवर्धनात भंडारा जिल्हा मोडतो का ?

राज्याच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील २३ नद्यांच्या संवर्धनाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केली आहे. त्याकरिता  १५० कोटी रुपयांचे खर्चाही अपेक्षित आहे. परंतु भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा आणि बावनथडी नदीचे त्यात समावेश राहणार की राज्य सरकारही जिल्ह्याची उपेक्षाच करणार, याकडे निसर्ग प्रेमी सामाजिक संस्थांचे लक्ष लागून आहे.

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More