Home » Tiger hunting  : मृतावस्थेत आढळलेल्या नर वाघ प्रकरणी पाच संशयित ताब्यात !

Tiger hunting  : मृतावस्थेत आढळलेल्या नर वाघ प्रकरणी पाच संशयित ताब्यात !

by vmnews24
232 views
Tiger-hunting

*शेतशिवरातून रानटी डुकराच्या हाडाचे सांगळे जप्त*

@amit_rangari.com

Tiger hunting : तुमसर तालुक्यातील बावनथळी प्रकल्पाच्या बपेरा-आंबागड दरम्यानच्या उसर्रला मार्गावरील लघु कालव्यात युवा नर वाघाचे मृतदेह ३१ मार्चच्या सायंकाळी संशयास्पद परिस्थिती आढळलून आले होते. त्यात वाघाची शिकारच झाल्याची अनधिकृत वाच्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. वाघाच्या अंगावरील जखमा, सापळ्यात अडकून फसल्याची चिन्हे, मागील पायांची नखे नसणे इत्यादींच्या नमुण्यांवरून प्रथम दर्शनी ही शिकरच(* Tiger hunting) ठरत आहे. याच दिशेने तपास राबवून परिसरातील शेतशिवार रडारवर घेऊन वन विभागाने सदर प्रकरणी तब्बल ५ संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात नाकाडोंगरी वन परिक्षेत्र अधिकारी मोहिते यांना विचारले असता त्यांनी आरोपींची नावे सांगण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र संशयितांच्या शेत शिवारातून वन अधिकाऱ्यांनी खुनाने माखलेले बैलबंडीचे दांडे, त्यासोबत रानटी डुकराच्या हाळाचे सांगळे जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यामुळे वाघाच्या प्रकरणावरून आता या घटनेला पुन्हा नवीन वळण नक्कीच येईल. मात्र वन विभाग या प्रकरणात आपल्याच शब्दांमध्ये  फसतांना दिसत आहेत, यात काही शंका नाही. येत्या दिवसात अनेक पैलू या शिकारीच्या (Tiger hunting ) घटनेवरून पुढे येणार हे नक्की! त्यात वन विभागाची कर्तव्य दक्षताही चौकशीच्या उंबरठ्यावर नक्की उभी राहणार यात काही दुमत नाही.

Tiger hunting  : संशयितांची नावे सांगण्यास वन विभागाचा नकार का ?

ज्या अर्थी संशयितांच्या शेत शिवारातून वन विभागाने रक्ताने माखलेले बैलबंडीचे दांड आणि रानटी डुकराच्या हाळाचे सांगळे जप्त केल्याची माहिती प्रतिनिधींना दिली, त्यात त्या शिवारात रानटी पशूंची शिकार होते, ही वास्तविकता असून देखील संशयितांची नावे सांगण्यास नकार कुठेतरी न पचणारे भासत आहे. महाराष्ट्राने एक पट्टेदार युवा नर वाघ दगावला त्यात चौकशीचा भाग म्हणून संशयितांच्या अस्मितेची फिकर करणाऱ्या वन विभागाने १ एप्रिलच्या आपल्या प्रेस नोटमध्ये शिकारीच्या प्रश्नावर साधे संशय देखील व्यक्त केले नाही. त्यात दैनिक विदर्भ कल्याणने आपल्या बातमीत उचललेले प्रश्न कुठेतरी घटनेची वास्तविकता ठरत आहे.

खूनाने माखलेले बैलबंडीचे दांडे वाघाच्या मृत्यूचे गूढ उलघडणार?

मृत वाघाच्या ओळखीची नोंद सध्या वन विभागाच्या रेकॉर्ड वर नाही. मात्र त्याची हत्याच झाली असल्याचे पशू वैद्यकीय अधिकारी यांचे अनुभवी शब्द आणि २ एप्रिलच्या सकाळी वन विभागाने गोळा केलेल्या पुराव्यांचे आधारे खूनाने माखलेले बैलबंडीचे दांडे त्या वाघाच्या मृत्यूचे गूढ उलघडन्यास नक्की मदतगार ठरणार असल्याचे दिसत आहे. विभागाने त्या दांड्या वरील रक्ताचे नमुने चौकशी करीता पाठवली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र जप्तीत खुल्या विद्युत प्रवाह संदर्भातील पोलादी जाळे, शिकारीचे सापळे याबाबत कसलीच माहिती वन विभागाने दिलेली नाही.

संशयितांच्या उसाच्या शेतात वाघाच्या पायांचे ठसे

दैनिक विदर्भ कल्यानाने आपल्या प्रकाशित वृत्तातून घटना स्थळाच्या १.५ किमी त्रोज्येत चौकशीचे प्रश्न उपस्थितीत केले होते. त्यातूनच वाघाच्या मृतदेह पासून अवघ्या अर्धा ते १ किमी अंतरावर संशयितांच्या उसाच्या शेतात वाघाच्या पायांचे ठसे विभागाला आढळून आले आहे. त्यातील काही ठसे हेतू परस्पर नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची चिन्हेही अंकित करण्यात आली आहेत. मात्र पोहता येणाऱ्या प्राण्याच्या सदर्भात बुडून मृत्यूची हलकी चौकशी पुढे कोणते रूप घेते याकडे लक्ष लागून राहील. तर वृत्त लिहेपर्यंत  विभागाने संशयितांची नावे सांगितली नाही.

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More