भंडारा :
Nana Patole : जिल्ह्यामधील धान खरेदी केंद्रावरील खरेदी मध्ये गैरव्यवहार असल्याचे खासदार सुनील मेन्ढे यांनी केंद्रीय मंत्र्याकड़े तक्रार केल्याचे सांगून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले Nana Patole यांना बदनाम करण्याच्या हेतूने त्यांचा जाणीवपूर्वक व्यक्तव्य केले. वास्तविक पाहता कुठलाही धान खरेदी केंद्राशी नाना भाऊ पटोले यांचा काहीही संबंध नाही. जिल्ह्यातील सहकारी संस्था धारक हे प्रत्यक्ष केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करतात. हे सर्व FCI मार्फत धान खरेदी करतात. त्यामधे राज्य सरकार हि नोडल ऐजंसि ची भूमिका बजवाते.
भंडारा गोंदिया व इतर धान उत्पादक सर्व जिल्हातील धान खरेदित मोठा भष्ट्राचार आहे म्हनुन नानाभाऊ पटोले Nana Patole यांनी विधानसभा अध्यक्ष असतानी चौकशी लावली. चौकशी आहवालात धान खरेदी मधे भ्रष्टाचार करणाऱ्या संस्था ह्या RSS व BJP संबंधित असल्यामुळे भाजप च्या नेत्यांनी केंद्रा मार्फत दबाव आणून चौकशी थांबावली. व यामधे त्यांचेच पितळ उघडे पडले. राहिला सवाल खासदार सुनील मेन्ढे यांचा तर हे खासदाराच्या भूमिकेत जनतेला कधीच दिसले नाही ते सतत ठेकेदारी च्या भाणगडित राहुन स्वहित जोपसन्यात मस्त आहेत. खासदार म्हनूंन अधिकारयावर दबाव आणने व ठेकेदारी मिळवणे व निस्कृष्ट दर्ज्यांचे कामे करुण भ्रष्ट मार्गाने पैसा गोळा करने हाच एकमेव उधोग त्यांचा आहे.
Nana Patole शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत असलेले नाना भाऊ
सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत असलेले नाना भाऊ यांना खासदार मेन्ढे विनाकारण बदनाम करीत आहेत. कोरोना च्या काळात सामाजीक भावनेने त्यानी कोरोना रुग्णालय शुरू केले होते परंतु अगोदरच आर्थिक अड़चनित असलेल्या भंडारा वासीयांकडून 50 हजार रुपये जमा केल्याशिवाय कोणावर उपचार करण्यात आला नाही. जिल्महा परिषद भंडारा चे बीओटी तत्वावर गाड़े बांधकाम करण्याचे काम त्यांना न मिळाल्याने ते उलट सुलट आरोप करित आहेत. आमच्या नेत्यावर आरोप करण्याची त्यांची लायकी नाही. पत्र परिषदेत पुठे बोलतांना जिल्हाध्यक्ष म्हनाले की, सुनील मेन्ढे स्वतः नगराध्यक्ष होते व खासदार आहेत. त्यांचा काळात नगर परिषद मधे अनेक कामामधे घोटाळे झालेले आहेत ते उघळ होऊ नये म्हनुन नाना भाऊ पटोले यांच्यावर असे खोटे आरोप करुण त्यांना बदनाम करण्याचा पर्यंत चालू आहे असे सांगितले.
यापुढे जिल्हा कांग्रेस यांनी नगर परिषदेत झालेले सर्व घोटाळे बाहेर काढू व जश्यास तसे उत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले यावेळी पत्रकार परिषदे मधे जिल्हाध्यक्ष् मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव शिशिर वंजारी, गट नेता रमेश पारधी, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, माज़ी जिल्हाध्यक्ष सागर गणवीर, जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे राजू पालीवाल, युवक कांग्रेस जिल्हा अध्यक्ष पवन वंजारी, अनुसूचित जाती महिला जिल्हाध्यक्ष मंजूषा चौव्हाण, महिला शहर अध्यक्ष पुष्पा साठवने, विनीत देशपांडे, सोहेल अहमद, अनिक जमा, नरेन्द्र साकुरे, आकाश ठवकर, आनंद चिंचखेडे इत्यादि उपस्थित होते.