Home » Assault on SDO Rathore :वसुली करिता गेलेल्या एसडीओं राठोड वर प्राणघातक हल्ला

Assault on SDO Rathore :वसुली करिता गेलेल्या एसडीओं राठोड वर प्राणघातक हल्ला

by vmnews24
496 views
Assault-on-SDO-Rathore

भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करांना मदत करणाऱ्या महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या करिता धडा

भंडारा :

Assault on SDO Rathore रेती तस्करा कडून वसुली  करायला गेलेले भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर रेती चोर/तस्कर जीवघेणा हल्ला त्यात  त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता. हा हल्ला का झाला ? पोलीस विभागाला न कळविता का गेले ? रात्री १२ ते पहाटे ३  वाजे पर्यत का जातात ?  यांची चर्चा सर्वत्र जोरात सुरु आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांचा गाडीत हल्लेखोरांचे तुटलेले पावडे व दगड आता जीवघेण्या हल्ल्याची साक्ष देत आहेत. तर दुसरीकडे ही घटना भंडारा   जिल्ह्यात वाळू तस्करांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना सबब शिकविणारी आहे. आताही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात याहीपेक्षा गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Assault on SDO Rathore जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर हे  तालुके वाळू तस्करीचे ‘हब’

भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीच्या सुबक वाळूला विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे वाळू तस्करांची नजर या जिल्ह्याकडे आहे. भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करी जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे भंडाऱ्याच्या वाळूला नागपुरात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर हे  तालुके वाळू तस्करीचे ‘हब’ बनले आहेत. वाळू तस्करीच्या हब मधून तस्करी सुरू असल्याचे भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांना यांना आधीच माहित होते. त्या त्या करिता ते  बुधवारी पहाटे ते तलाठी सह, पवनी निलज रस्त्यावर, गाढवे पटवारी यांच्या खाजगी गाडीने, गाडी क्रमांक MH 36 AG 3557 Maruti Ertica गेले होते . पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास रेतीचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना त्यांना दिसले. टिप्परला थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बेटाळा जवळ टिप्पर राठोड यांनी  अडविला.

उपविभागीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

कुणाला काही कळायच्या आतच 15 ते 20 तस्करांनी हातात काठ्या दगड, फावडे घेऊन हल्ला पथकावर हल्ला चढवला. यात उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले असून त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यात हल्लेखोरांनी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कसेबसे 15 ते 20 लोकांच्या टोळीतून स्वतःचा बचाव केला. सदर हल्ल्याची  माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तो पर्यंत तस्कर पसार झाले होते. लागलीच उपविभागीय अधिकारी राठोड यांनी पवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रेती तस्करांना सहकार्य करणार्यांना चपराक

विशेष म्हणजे लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरात दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या पथकांवर रेती तस्करांनी लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. लाखनीच्या हल्ला प्रकरणात  दोन तस्करांना अटक करण्यात आली होती. दुसरीकडे कारवाई करायला गेलेल्या पवनीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी यांना वाळू तस्करांनी धमकाविणे  गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. आता थेट एसडीओंच्या पथकावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ माजली असून ही घटना भंडाऱ्यात रेती तस्करांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या थोबाडात मारले सारखे आहे.

रविंद्र राठोड यांची रोज रात्री ५ ते ६ लाख रुपयाची वसुली

  रविंद्र राठोड दररोज रात्री बारा वाजे नंतर पटवारी, पंटर या साथीदारा सह वसुली ला निघत असल्याची माहिती सुत्रा प्राप्त झाली आहे. गाडी अडवून त्यांचे कडून १ लाख रुपयाची मागणी केली जाते. न देणाऱ्या तस्कराची गाडी एसटी डेपो मध्ये जमा केली जाते. ४ दिवस वाट पाहून नंतर दंड आकारला जातो. आर्थिक व्यवहार झाला तर गाडी सोडून दिली जाते. असा आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी मागील अधिवेशनात केला होता.

पालक मंत्र्यांनी केली होती राठोड यांची  कान उघाडणी

राठोड हा अतिशय मग्रूर, असभ्य व्यक्तिमत्वाचा व्यक्ती असल्याची तक्रार जनमानसात नेहमीच ऐकायला मिळते. रात्र भर वसुली करणे, आफिस ला हजर न राहणे हे नेहमीचेच आहे. त्यामुळे जनतेची कामे रेंगाळली राहतात. पालक मंत्री भंडारा दौरा वर आले असता त्याची तक्रार पालकमंत्री विश्वजित कदम यांचे कडे करण्यात आली होती. त्या वेळी पालकमंत्री यांचे हात जोडून माफी मागीतली होती

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More