Home » Sand Smuggler : रेती माफियां सोबत पोलिसांची मटण पार्टी ; धक्कादायक VIDEO व्हायरल

Sand Smuggler : रेती माफियां सोबत पोलिसांची मटण पार्टी ; धक्कादायक VIDEO व्हायरल

by vmnews24
818 views
Sand-Smuggler

भंडारा :  

Sand Smuggler रविंद्र राठोड, भंडारा, उपविभागीय अधिकाऱ्यावर रेती माफियांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकातील कर्मचारी चक्क आरोपी आणि रेती तस्कर Sand Smuggler यांसोबत मटण पार्टी करीत विडीओ व्हायरल झाल्याने  खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली चौकशीअंती कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले. 27 एप्रिलच्या पहाटे अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्याच्या दृष्टीने गेलेले भंडार्‍याची उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड  यांच्या सह त्यांच्या पथकावर 20 ते 25 रेती माफियांनी हल्ला चढविला होता. राठोड यांनी गाढवे पटवारी  यांच्या मालकीची मारुती एर्तिका गाडी घेऊन गेले होते. गाडीची तोडफोड करण्यात आली होती.

Sand Smuggler  उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मारहाणीचे प्रकरण वेगळ्याच दिशेने

या प्रकरणाची पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पंधरा ते वीस लोका विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आले. दरम्यान यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथका पैकी एका पथकातील पोलिस कर्मचारी चक्क रेतीची अवैध व्यवसाय करणारे आणि मारहाण प्रकरणातील आरोपी सोबत मटण पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पार्टीत सहभागी असलेले पवनी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलीप घावडे हे आपल्या विक्रमाच्या थापा  मारताना दिसत आहे. येथे असताना अनेकांची नावे उडविली. हि किरकोळ गोष्ट आहे असे सांगून दोषींना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचे दिसते. यामुळे आता पोलीस खाते खडबडून जागे झाले असून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मारहाणीचे प्रकरण वेगळ्याच दिशेने जात असल्याचे दिसू लागले आहे. दोषी  पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भंडारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. परंतु व्हिडीओची सत्यता तपासून चौकशी नंतर कारवाई करण्यात येईल असे भंडारा  पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

व्हायरल विडीओ जुना असल्याचा अनेकांचे मत

 मटन पार्टी चा व्हायरल विडीओ हा जुना असल्याचा अनेकांचे मत कारण सदर विडीओ हा उमरेड मधील “द मर्शी हाटेल उमरेड” मधील आहे त्यामध्ये पोलीस कान्सटेबल दिलीप धावडे सोबत विडीओ मध्ये लांबट पोलीस शिपाई, खुशांत कोचे पोलीस शिपाई, सचिन जिभकाटे होमगार्ड आहे. काही रेती तस्कर व पोलीस मटन, चिकन, फिशफ्राय, दारू चा आश्वाद घेताना दिसत आहेत त्यामध्ये रेती तस्कर किशोर पंचभाई, अटक झालेला राजू मेंघरे रा. बाम्हणी हा सुद्धा आहे. याचा अर्थ आरोपी  व्यक्ती जेवण करायला कसा गेला. हल्ला घटना वेळ पहाटे ३.१५ च्या आसपास ची आहे.

घटना स्थळावरून उमरेड हाटेल अंतर जवळपास पाऊन तासाचे आहे. इतक्या पहाटे म्हणजे जवळ पास ४ वाजे पर्यंत हाटेल सुरु होते काय ? त्या पोलिसांची जुळवाजुळव रेती तस्करांनी कशी केली ?, पहाटे  चार वाजे पर्यंत रेती तस्कर व पोलीस उपाशी होते काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. जर यात सत्यता असेल हा हल्ला पूर्व नियोजित कट होता असे म्हणावे लागेल. त्या करिता विडीओ मध्ये दिसत असलेल्या सर्व व्यक्ती वर गुन्हे दाखल करून अटक करणे गरजेचे आहे त्यात पोलीस कर्मचारी सुद्धा सुटता कामा नये.

पूर्व नियोजित योजने प्रमाणे कांड

पवनी तालुक्यातील फक्कनचोट व्यति रेती चोरी व तस्करीमुळे गब्बर श्रीमंत झाले आहेत. स्थानिक राजकारणी निर्वाचित नेता यांचे अर्थ पूर्ण अभय प्राप्त झाले आहे. चिंधी भाऊ तर या  नेत्याचा व्यवसाईक पार्टनर आहे. हा पार्टनर रेती तस्करी मध्ये अव्वल असून आता त्याचे नेत्या बरोबर बिनसल्याची चर्चा आहे. या नेत्यानेच SDO राठोड ला चिंधी मित्राच्या गाड्या पकडायला पाठविल्या आणी नियोजित योजने प्रमाणे कांड घडविण्यात आला. अशीही माहिती समोर येत आहे.

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More