Home » Manro School मनरो शाळेच्या व्यवसाईक “बांधा, वापरा व हस्तांतरीत” करा या कामाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती

Manro School मनरो शाळेच्या व्यवसाईक “बांधा, वापरा व हस्तांतरीत” करा या कामाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती

by vmnews24
927 views

जे भाजप च्या फुके, मेंढे, बावनकुळे या नेत्यांना जमले नाही ते शिवसेना च्या एकट्या आमदाराने करून दाखविले

भंडारा :

 Manro School भंडारा शहरात मागील वर्षभरापासून चर्चेत असलेल्या “मनरो” लाल बहादुर शास्त्री हायस्कुल भंडारा येथील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील Manro School भुखंड खाजगीकरणाच्या माध्यमातून बांधा , वापरा व हस्तांतर करा या तत्वावर विकसीत करण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी आ. नरेंद्र मोंडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती . आ . नरेंद्र भोंडेकर यांच्या आक्रमक भुमिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार ग्रामविकास विभागाने दि . १ जून २०२२ रोजी जि. प . मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून सदर कामाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे . ही बातमी कळताच मनरो शाळेसमोर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

Manro School प्रकल्प प्रस्तावास शासनेच  मान्यता दिली होती

ग्राम विकास विभागाच्या दिनांक १० मार्च २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये , भंडारा जिल्हा परिषदेच्या Manro School ताब्यातील लाल बहादूर शास्त्री मनरो हायस्कुल शिट नं . ११ येथील ( क्षेत्रफळ २११ ९ .६० चौ.मी. ) व जनपद जुनी जिल्हा परिषद इमारत शिट नं .५३ येथील ( क्षेत्रफळ ८०१.९ १ चौ.मी. ) क्षेत्रफळचा भुखंड बांधा , वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर विकसित करण्याच्या एकूण रु . ११३३.५६ लक्ष प्रकल्प प्रस्तावास शासन मान्यता दिली होती .

आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाला यश, येणाऱ्या न.प. निवडणुकीत होईल फायदा

आ. नरेंद्र भोंडेकर यांनी प्रस्तुत प्रकरणाची सखोल बाबींची चौकशी करून उक्त शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि. १७ मे २०२२ रोजी पत्र पाठवून केली होती . तसेच मनरो शाळा बचाव समितीने सुद्धा ही मागणी केली होती. या प्रकरणात अनेक संघटनांचा वाढता विरोध व जनसामान्यांच्या भावनाचा आदर करीत आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी , जि . प . मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे काम थांबविण्याची मागणी केली होती . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होती. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रस्तुत प्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेच्या Manro School ताब्यातील भुखंड बांधा , वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर विकसित करण्याच्या कामाला पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याने ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी वि . र . शिंदे यांनी दि . १ जून रोजी जि . प . मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कळविले आहे

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More