Home » Narendra Bhondekar MLA : आमदार नरेंद्र भोंडेकर हे मुख्यमंत्र्यांचे खंदे  समर्थक असल्याने मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे स्पष्ट संकेत  

Narendra Bhondekar MLA : आमदार नरेंद्र भोंडेकर हे मुख्यमंत्र्यांचे खंदे  समर्थक असल्याने मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे स्पष्ट संकेत  

by vmnews24
1,227 views
Narendra-Bhondekar-MLA

भंडारा जिल्ह्याला हक्काचा पालक मंत्री मिळेल म्हणून जिल्हावासी आतुर  

भंडारा :

Narendra Bhondekar MLA उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच पेढे वाटून उत्सव साजरा करून स्वतच मुख्यमत्री म्हणून करून शपथविधी कार्यक्रम घोषित करून  देवेंद्र फडणवीस तोंडघशी पडले. आपल्या धेय्य आणी उधिष्टा प्रती ठाम नसेल तर तो शिवसैनिक कसला नेमके तेच घडले. एकनाथ शिंदे मुंबईत येताच हुकुम चा एक्का टाकत बाजी पलटली त्या समोर देवेंद्र फडनविस यांना नांगी टाकावी लागली. त्या नंतर मी मंत्रीमंडळ बाहेर राहून सरकार ला कामकाजात सहकार्य करेल हि घोषणा सुद्धा केली म्हणजे किंग मेकर, रिमोट कंट्रोल अशी बिरुदे मिळण्याची लागलीच सुरवात सुद्धा केली वेळीच संभाव्य धोका ओळखून मास्टर स्ट्रोक लावत त्यांना असंविधानिक उपमुख्यमंत्री पदी शपथ घेण्यास बाध्य केले. भाजपा वाले सावरा सराव करीत जे.पी नद्डा, आणी अमित शहा यांचे आदेश होता हे सामजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वात राज्यात सत्ता स्थापन होईल याची जवळपास सगळ्यांनाच खात्री असताना फडणवीसांऐवजी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता. मात्र आता शिंदे मुख्यमंत्री झाल्याने भंडा-याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या आहेत. आमदार नरेंद्र भोन्डेकर मंत्री Narendra Bhondekar MLA झाल्यास बरेच वर्षानंतर पहिल्यांदा भंडारा जिल्ह्याला हक्काचा  कायम स्वरूपी पालकमंत्री मिळेल अशी खात्री जिल्हावासी यांना आहे. त्यामुळे एकदाचा पालकमंत्री दुष्काळ संपेल.

Narendra Bhondekar MLA अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आले

शिवसेनेतून बंड करीत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत भंडा-याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे पहिल्या दिवसापासून नाही तर सदैव त्यांच्या सोबतच आहेत. यापुर्वी पाच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून काम करताना भोंडेभों डेकर हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जात होते. मधल्या काळात नरेंद्रजी  भोंडेकर हे पराभूत झाले होते. मात्र 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आले. मात्र शिवसेनेचेच म्हणून ते वावरत होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णयही पहिल्याच दिवशी भोंडेकर यांनी घेतला.

. सेनेत असताना भोंडेकर Narendra Bhondekar MLAआणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध असल्याचे संगितले जाते. बंडाच्या पार्श्वभूमीवर ते उघड झाले. आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्याने भोंडेकर यांच्या मंत्रिपदाच्या आशा बळावली आहे. दुस-यां दा आमदार म्हणून कारकीर्द घालवीत असलेल्या भोंडेकर यांच्या बाबतीत मंत्रिपदाची दारे उघडली जाण्याची शक्यता आहे. अशावेळी त्यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्री लाभल्यास बरेच वर्षानंतर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळेल अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

आमदार डॉ. परिनयजी फुके समर्थकही आशावादी

नाईलाजाने का होईना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे आमदार परिणय फुके हे मंत्री पदाच्या बाबतीत आश्वस्त आहेत. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजपा मधील अंतर्गत गुटबाजी मुळे पुन्हा विधान परिषदेवर निवडून येतीलच यांची खात्री देता येत नाही. मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने काहीशे हे आमदार परिणय फुके समर्थक नाराज असले तरी मंत्रिमंडळात भाजपच्या आमदारांचा समावेश राहणार असल्याने फुके समर्थकांमध्ये अजूनही उत्साहाचे वातावरण आहे. आता मंत्रिमंडळात नेमकी कोणाची वर्णी लागते की दोघांच्याही नशीब फळफळतात हे लवकरच स्पष्ट होईल.

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More