23.8 C
Los Angeles
Thursday, October 6, 2022

लाखनीत संततधार पावसाने जनजीवन अस्तव्यस्त

लाखनी : तालुक्यात रविवार(ता.११) सायंकाळ पासून पावसाला सुरुवात...

वन हक्क धारकाचे नावाने स्वतंत्र ७/१२ तयार करा

लाखनी : तालुक्यातील पारंपरिक वनवासी व आदिवासींना...

गोंडवाना विद्यापीठ विद्यापरिषद निवडणुक डॉ. जयदेव देशमुख दुसऱ्यांदा विजयी

Bhandara Newsगोंडवाना विद्यापीठ विद्यापरिषद निवडणुक डॉ. जयदेव देशमुख दुसऱ्यांदा विजयी

भंडारा:

गोंडवाना विद्यापीठ सिनेट व अकॅडमीक कौन्सिलचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात ” वाणिज्य व व्यवस्थापन ” या विद्याशाखेतून अकॅडमीक कौन्सिल मध्ये डॉ. जयदेव देशमुख 475 असे भरघोस मते घेऊन विजय झाले. ते भंडारा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावरील चिखलपहेला या छोट्याशा खेड्यातील मूलनिवासी आहेत. अत्यंत सामान्य शेतकरी परिवारात वाढलेले, शेत मजूरी करून वेळप्रसंगी पोटाची उपासमार करून शिक्षण पूर्ण केले. आणि लगेच १९९१ पासून डॉ. जयदेव देशमुख आदर्श महाविद्यालय देसाईगंज वडसा येथे वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यांनी गावातच प्राथमिक शिक्षण, भंडारा येथे वस्तीगृहात राहून माध्यमिक शिक्षण, सिंदेवाही येथे मानलेल्या भावाकडे राहून पदवी पर्यंतचे शिक्षण आणि नागपूरच्या गोविंदराव सेक्सारिया महाविद्यालयातून एम.काॅम.चे शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक व्हायचे स्वप्न त्यांना स्वस्त बसू देत नव्हते आणि त्या दिशेने त्यांचे पाऊल पुढे पुढे पडत गेले.

संघर्षमय निवडणुकीत सुध्दा सलग दुसऱ्यांदा निवडून दिले

एम कॉम पूर्ण झाल्याबरोबर त्यांचे स्वप्न वास्तवात उतरले. त्यांच्या सेवेला आजघडीला ३१ वर्षेप पूर्ण झालीत. त्यांनी यापूर्वी नागपूर विद्यापीठात अभ्यास मंडळावर सदस्य आणि गोंडवाना विद्यापीठ स्वतंत्र झाल्यापासून अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य म्हणूनही कार्य केलेले आहे. प्राध्यापक मतदारांनी डॉ. देशमुख यांच्या विद्यापीठातील विविध प्राधिकरणातील कामाचा अनुभव व त्यांचे व्यक्तिमत्व विचारात घेऊन या संघर्षमय निवडणुकीत सुध्दा सलग दुसऱ्यांदा निवडून दिले. यातून त्यांचे व्यक्तिमत्व लक्षात येते. ते नागपूर व गोंडवाना या दोन्ही विद्यापीठात सर्वत्र परिचित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ते मागील २० वर्षापासून प्राध्यापकांच्या नुटा संघटनेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रथम सचिव आणि आता अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते राज्यस्तरीय एमफुक्टोचे सदस्य आहेत. ते विद्यार्थी व पालक वर्गांत एक प्रिय प्राध्यापक म्हणून परिसरात सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या निवडणूकीतील यशाबद्दल कुटुंबीय,पहेला परिसर व भंडारा जिल्ह्यातील नागरिक, मित्र मंडळी, नातेवाईक व आप्तेष्ट कौतुकाचा वर्षाव करीत आहेत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles