23.8 C
Los Angeles
Thursday, October 6, 2022

गोंडवाना विद्यापीठ विद्यापरिषद निवडणुक डॉ. जयदेव देशमुख दुसऱ्यांदा विजयी

भंडारा: गोंडवाना विद्यापीठ सिनेट व अकॅडमीक कौन्सिलचा...

वन हक्क धारकाचे नावाने स्वतंत्र ७/१२ तयार करा

लाखनी : तालुक्यातील पारंपरिक वनवासी व आदिवासींना...

लाखनीत संततधार पावसाने जनजीवन अस्तव्यस्त

Bhandara Newsलाखनीत संततधार पावसाने जनजीवन अस्तव्यस्त

लाखनी :

तालुक्यात रविवार(ता.११) सायंकाळ पासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री नंतर पावसाचा वेग वाढला. तालुक्यात १२ सप्टेंबर रोजी ३८.२० मिलिमीटर पावसाची तालुका प्रशासनाने नोंद घेतली आहे. चुलबंद नदीच्या जलस्तरात सातत्याने वाढ होत आहे. चूलबंद खोऱ्यातील अनेक मार्ग पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे दळणवळणासाठी बंद झाले आहेत. विहिरगाव(कन्हाळ्या), नरव्हा, पाथरी, मरेगाव, वाकल इत्यादी गावालगत पुराचे पाणी आलेले आहे. जलस्तर असाच वाढत राहिल्यास या गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तलाव तुडुंब भरले असून रपट्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे काठावरील शेतात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज

तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार मडावी, उर्कुडकर, सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांचेसह गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चाहांदे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुल अथवा रपट्यावरून पाणी वाहत असताना ओलांडू नये. असे प्रशासनामार्फत जनतेस आवाहन करण्यात आले आहे. वृत्त लीहिंपर्यंत जीवितहानी ची घटना घडली नव्हती. पुराचे पाणी शेतात जमा होऊन धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. संततधार पावसामुळे पाळीव जनावरांना वैरणाची समस्या निर्माण झाली. तसेच काही गावात वीज पुरवठा खंडित झाला होता.

हे रस्ते आहेत बंद

संततधार पावसामुळे नदी नाल्यांचा जलस्तर वाढल्याने पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे सोनमाळा ते मिरेगाव, निमगाव ते पालांदूर, किटाडी ते पेंढरी, तई ते वाकल, तई ते पाऊळदवणा, किटाडी ते मासळ, मोगरा ते कनेरी/दगडी आणि पोहरा ते धाबेटेकडी हे रस्ते वाहतुकीसाठी बंद होते.

विजेच्या धक्क्याने महिला जखमी

मिरेगाव येथे रविवारी(ता.११) सायंकाळी ५:३० वाजतादरम्यान शशिकला प्रदीप गजबे(४०) स्वतःचे घरी दरवाज्यात बसली असता अचानक विजेचा कडकडाट होऊन शॉक लागल्याने जखमी झाल्या. तर घरातील २ इलेक्ट्रिक बोर्ड व एलईडी टीव्ही जाळून १२ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles