23.8 C
Los Angeles
Thursday, October 6, 2022

गोंडवाना विद्यापीठ विद्यापरिषद निवडणुक डॉ. जयदेव देशमुख दुसऱ्यांदा विजयी

भंडारा: गोंडवाना विद्यापीठ सिनेट व अकॅडमीक कौन्सिलचा...

लाखनीत संततधार पावसाने जनजीवन अस्तव्यस्त

लाखनी : तालुक्यात रविवार(ता.११) सायंकाळ पासून पावसाला सुरुवात...

वन हक्क धारकाचे नावाने स्वतंत्र ७/१२ तयार करा

Bhandara Newsवन हक्क धारकाचे नावाने स्वतंत्र ७/१२ तयार करा

लाखनी :

तालुक्यातील पारंपरिक वनवासी व आदिवासींना वन हक्क कायद्यानुसार सरकारी अतिक्रमित जमिनीचे उपजिविकेसाठी पट्टे मिळाले. पण मिळालेल्या शेतजमिनीचा स्वतंत्र ७/१२ तयार करण्यात आला नाही. त्यामुळे आदिवासी व पारंपरिक वन निवास्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वन हक्क धारकांची अडचण लक्षात घेऊन महसूल विभागाने तत्काळ वन हक्काने मिळालेल्या जमिनीचा लवकरात लवकर स्वतंत्र ७/१२ तयार करावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे.

आदिवासी कुटुंबीयांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून उपजीविका चालवीतात


वन क्षेत्रालगत वास्तव्यास असलेल्या पारंपरिक वन निवासी व आदिवासी कुटुंबीयांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून आपली उपजीविका चालवीत असत. काही कुटुंबे तर ४ ते ५ पिढ्यांपासून जमीन कसत होते. या बाबद वन विभाग किंवा शासनाने दखल घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. ही बाब साकोली विधान सभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांना माहीत होताच त्यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण असणाऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. या करिता जेलभरो आंदोलन केले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन वन हक्क अधिनियम २००६ संमत करून सरकारी वन जमिनीवर अतिक्रमण असणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेऊन पारंपरिक वन निवासी व आदिवासी कुटुंबांना दिलासा दिला. पण स्वतंत्र ७/१२ तयार केला नसल्यामुळे या कुटुंबांना शासनाच्या योजना पासून वंचित राहावे लागते. असे माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांचे म्हणणे आहे. आदिवासी व पारंपरिक वन निवासी कुटुंबांची ७/१२ ऐवजी होणारी कुचंबणा लक्षात घेता वन हक्कानुसार मिळालेल्या शेतजमिनीचे लवकरात लवकर स्वतंत्र ७/१२ तयार करण्यात यावे. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles