घोटाळे बाज अधिकर्यांवर तात्काळ कार्यवाही करा – अजय गोपीचंद मेश्राम
A scam in Bhandara general Hospital: भंडारा सामान्य रुग्णालयातील ऑर्थोपेडीक विभागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत 2019-20, 2020-21, आणि 2021-22 या कालावधीत तात्कालीन अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. त्यांनी खरेदी प्रक्रियेत ऑनलाईन ट्रेडर न करता लिफाफा पद्धतीने प्रक्रिया राबवून ठेकेदाराला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सरकारच्या खजिन्यात करोडो रुपयांचा अपहार झाला, अशी तक्रार मी, अजय गोपीचंद मेश्राम, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे 15 मार्च 2024 रोजी केली होती.
या संदर्भात तक्रार आम्ही पुन्हा पालकमंत्र्यांना पुराव्यासह सादर केली, परंतु त्यांनी याची गंभीरता समजून घेतली नाही. त्यामुळे या घोटाळ्याचे माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही, याबाबत आमच्या मनात शंका आहे.सामान्य रुग्णालयातील खरेदीमध्ये अधिकाऱ्यांनी एका वस्तूची किंमत आजच्या किंमतींपेक्षा चार ते आठ पट जास्त लावली. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात चुना लावण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या तपास अहवालानुसार, खरेदी प्रक्रियेत मान्यता प्राप्त वृत्तपत्रांमध्ये टेंडर जाहिरात देण्यात येत नाही.
या खरेदीच्या घोटाळ्यामुळे शासनाला लाखो ते करोडो रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आम्ही उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती, परंतु आठ महिने लोटून गेल्यानंतरही भ्रस्टाचारी अधिकाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.आम्ही मागणी करतो की या प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अपहार झाल्याचा पुरावा आणि अहवाल याबरोबर जोडलेले आहेत.घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करुन निलंबित करण्यात यावे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि घोटाळ्यात सहभागी अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित केले जावे. अन्यथा, मी आठ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.