मौजा गणेशपूर, बेला, पिंगलाई, खोकरला, जमणी, मुजबी, भंडारा नगर परिषदेच्या कक्षेत
भंडारा नगर परिषद हद्दवाढ प्रक्रिया शासन दरबारी दीर्घकाळापासून प्रलंबित होती. हद्दवाढ झाल्यानंतर ग्रामीण भागातील जमिनी, स्थावर मालमत्ता आणि शेतीला शहरी दर लागू होतील. त्यामुळे शहराला मिळणाऱ्या नागरी सुविधा वाढतील, तसेच केंद्र व राज्य शासनाचा निधी अधिक प्रमाणात मिळेल. यामुळे ग्रामीण भागाला शहरी स्वरूप प्राप्त होईल आणि भंडारा नगर परिषदेला नगर पालिका दर्जा मिळेल. शासनाच्या या निर्णयाचे सर्व नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ६ चे पोट कलम (२) आणि कलम ३ च्या पोट कलम (३) नुसार, नगर विकास विभागाच्या आदेशानुसार, ११ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात हद्दवाढीची उद्घोषणा प्रकाशित करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा नगरपरिषदेची हद्दवाढ करण्यासाठी आवश्यक अधिसूचना काढण्याबाबत आक्षेप मागवण्यात आले आहेत.
भंडारा नगर परिषदेसाठी सुधारित सीमांची माहिती अशी आहे:
- मौजा जमनीच्या गट क्र. १ पासून दक्षिणेकडे गट क्र. २, नाल्याच्या काठाने गट क्र. १०० जवळील मौजा हद्दीपर्यंत.
- मौजा पिंगलाईच्या गट क्र. ३३३ जवळील नाल्याच्या काठाने गट क्र. ३१० पर्यंत.
- मौजा केसलवाडाच्या गट क्र. २३३ जवळील नाल्याच्या काठाने गट क्र. २३०, २०९, १९९, १४०, १२८, ९३ पर्यंत.
- मौजा खोकरल्याच्या गट क्र. १०१ पासून गट क्र. ४९ पर्यंत.
- मौजा भोजपुरच्या गट क्र. ९३ जवळील नाल्यापासून गट क्र. ८९ पर्यंत.
- मौजा मुजबी येथील गट क्र. १२३ पासून गट क्र. १५ पर्यंत.
पूर्व भाग:
मौजा जमणीतील गट क्र. ०१ पासून सुर नदीच्या गट क्र. ३७ पर्यंत आणि वैनगंगा नदीच्या संगमापर्यंत.
पश्चिम भाग:
मौजा बेलाच्या दक्षिणेकडील रेल्वे लाईनपासून नाल्याच्या काठाने गट क्र. ३९ पासून गट क्र. ४८ पर्यंत, तसेच राष्ट्रीय महामार्ग ओलांडून गट क्र. ३०७ पर्यंत.
दक्षिण मौजा गणेशपूर:
गट क्र. २३० पासून नाल्याच्या काठाने गट क्र. १३७ पर्यंत आणि रेल्वे लाईन पर्यंत.
या हद्दवाढीमुळे भंडारा नगर परिषदेला शहरी सुविधांचा लाभ होईल, ज्यामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल.