खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची Amrut Bhart Rail Scheme रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांशी आढावा बैठक
Amrut Bhart Rail Scheme अमृत भारत रेल योजनेची खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली पोलखोल खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी विभागीय रेल्वे मंडल अधिकारी विजय कुमार गुप्ता आणि इतर रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक रेल विभागीय मंडल कार्यालय नागपूर येथे घेतली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि रेल्वे विभागातील अनेक समस्या उघडकीस आल्या.
अमृत भारत रेल योजनेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
बैठकीत अमृत भारत रेल परियोजनेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. खासदार पडोळे यांनी सांगितले की, या प्रकल्पातील कामे केवळ लीपापोती स्वरूपाची आहेत. कामे अतिशय वेगाने केली जात आहेत, पण त्याचा दर्जा निकृष्ट आहे. काही फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्यांनी Amrut Bhart Rail Scheme रेल्वे विभागाची पोलखोल केली. तसेच, रेल्वेचे बांधकाम जुने असून त्याचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या.
रेल्वे हॉस्पिटलच्या सुविधांवरील चिंता
रेल्वे विभागाकडे स्वतंत्र १८५ बेडचे हॉस्पिटल असूनही, त्यात अनेक आवश्यक सुविधा नसल्यामुळे रेल्वे कर्मचारी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागतात. Amrut Bhart Rail Scheme यावर खासदार पडोळे यांनी आपली खंत व्यक्त केली.
गोंदिया ते बल्लारशहा नवीन रेल्वे ट्रॅक आणि सौंदड ओवर ब्रिज
Amrut Bhart Rail Scheme अंतर्गत, गोंदिया ते बल्लारशहा दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक तयार होत आहे, मात्र सौंदड येथील ओवर ब्रिजचे काम अजून पूर्ण झालेले नाही. या कामाच्या विलंबाबाबत खासदारांनी विभागीय अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या.
पाणी साठवण आणि जलसंधारणासाठी रेल्वेचे प्रयत्न
रेल्वे जवळ देशातील सर्वाधिक जागा असूनही, पाणी साठवण (वॉटर हार्वेस्टिंग) यंत्रणा नाही. खासदार पडोळे यांनी Amrut Bhart Rail Scheme अंतर्गत रेल्वेने पुढाकार घेऊन सर्व रेल्वे स्थानक व इमारतींमध्ये जलसंधारणासाठी वाटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
भंडारा शहरातील रेल्वे पटरी खाली जागेचा विकास प्रस्ताव
भंडारा शहराच्या मध्यभागी रेल्वे पटरीखाली जागा आहे, जी रेल्वेने रस्त्याच्या विकासासाठी दिल्यास शहरातील वाहतुकीची समस्या सुटू शकते. खत रोड, म्हाडा कॉलनी, शुक्रवारी वार्ड या भागांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा हा रस्ता शहरातील सर्वात मोठा रस्ता बनेल. यासाठी Amrut Bhart Rail Scheme अंतर्गत भंडारा नगर परिषदेच्या प्रस्तावाला विभागीय मंजुरी देण्याचे आदेश खासदार पडोळे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत रेल्वे विभागातील कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, कामे नियोजित आणि दर्जेदार पद्धतीने करावीत, तसेच कर्मचारी सुविधा सुधारण्याच्या बाबतीतही योग्य तो विचार करावा, असे निर्देश खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले आहेत. रेल्वेच्या विकासासाठी आणि कर्मचारी कल्याणासाठी पुढील काळातही असे आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गोंदिया-बल्हारशहा दरम्यान नवीन दुहेरी रेल्वे लाईन
गोंदिया ते बल्लारशहा नवीन रेल्वे ट्रॅकचे काम कधी पूर्ण होणार याबाबत थेट तारीख किंवा पूर्ण होण्याचा कालावधी या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र, या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४,८१९ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पुढे जाणार आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला मोठे महत्त्व दिले असून, यामुळे विदर्भातील पर्यटन, व्यवसाय आणि वाहतूक सुधारण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
या प्रकल्पामुळे गोंदिया-बल्हारशहा दरम्यानची रेल्वे लाईन दुहेरी होऊन प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी अधिक कार्यक्षम होईल, परंतु काम पूर्ण होण्याच्या तारखेवर अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही त्यामुळे Amrut Bhart Rail Scheme अंतर्गत कामाच्या पूर्णतेसाठी निश्चित कालमर्यादा अद्याप स्पष्ट झालेली नाही.
विजन मोठे पण अंमल बजावणी शून्य
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजी विजन अनेकांना प्रेरणादायक वाटत असले तरी, अंमलबजावणीच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशांत पडोळे यांनी या संदर्भात टीका करताना म्हटले की Amrut Bhart Rail Scheme मोदींचे स्वप्न मोठे असले तरी त्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणीचा परिणाम शून्य आहे. योजनांची केवळ घोषणा होते, पण त्यांचे कामगिरीत रूपांतर होत नाही. अनेक प्रकल्प लीपापोती स्वरूपाचे असून कामांचा दर्जा निकृष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे Modiंच्या २०४७ च्या स्वप्नाला प्रत्यक्षात कसे साकार करायचे, याबाबत शंका निर्माण होत आहे. सरकारने २०४७ च्या ध्येयासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तंत्रज्ञानाचा वापर करून योजना आखल्या पाहिजेत. तसेच, देशाला जागतिक स्तरावर विश्वगुरु बनवण्यासाठी केवळ आर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे पाऊल उचलणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून सर्व कर्मचाऱ्यांनी काम करावे अश्या सूचना दिल्या.
Dr. Parinay Fuke MLA : मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा : आमदार डॉ. परिणय फुके