Bhandara Assembly Election Exit Poll : Bhandara Assembly Election Exit Poll केले होते. तुमसरचे चे आमदार लंगर सम्राटच ठरले. धान घोटाळातून कमविलेला पैसाची उधळण तुमसर मध्ये पाहायला मिळाली. तर दुसरीकडे पैशाची पाकिटे मतदारांना वाटण्यात आली. त्यामुळे हाच खरा विकास पुरुष म्हणून निर्बुद्ध कार्यकर्ते कामाला लागली.
भंडारा विधान सभेत स्पर्धेत तिन उमेदवार
निकालाला एक दिवस बाकी असताना लोक एकमेकांना भेटल्या नंतर एकच प्रश्न करतात, कोण निघेल ? आमच्या कडे अलाणा चालला, तुमच्या कडे फलाना चालला यावर तर्कवितर्क लाऊन अंदाज बांधत आहेत. विनाकारण वादविवाद घालत आहेत. भंडारा विधान सभेत स्पर्धेत तिन उमेदवार होती. कांग्रेस ने “दलित- कुणबी” सौ. पुजा गणेश ठवकर (गजभिये) या महिलेला उमेदवारी देऊन दोन्ही समजाची मते मिळवून विजय खेचून आणण्याची रणनीती आखली होती. तर “उबठा” चे बंडखोर उमेदवार नरेंद्र पहाडे यांची रणनीती हि विद्यमान आमदार भोन्डेकर यांचे विरोधक, यांच्या कार्याला कंटाळलेले लोक यांना सोबत घेऊन हिंदू दलित मते घेण्याची रणनीती होती.
निष्ठावान कार्यकर्ते बाजूला सारल्या गेले
विद्यमान आमदार नरेंद्र भोन्डेकर हे मागील पाच वर्षापासूनच २०२४ च्या निवडणुकीची तयारीला लागले होते. नागरी सुविधा करिता अनेक बगीचे, रस्ते, नाल्या, सोलर लाईट, पर्यटन करिता 3 हजार करोड शासना कडून आणले . दुसऱ्या पक्षातील अनेक लोकांना काम देण्याचे आमिष देऊन आपल्याकडे वळविले. कोणतेही राजकीय वलय नसलेले, ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून निवडून येण्याची लायकी नसलेले लोक भोन्डेकर यांनी गोळा केले, त्यांचा निवडणुकीत फायदा होतांना मुळीच दिसला नाही. उलट निष्ठावान कार्यकर्ते बाजूला सारल्या गेले. त्यांचे पोटभरू बेरोजगार स्वीय सहाय्यक यांचे मतदार, जनता, इतर कार्यकर्ते, शासकीय अधिकारी यांचेशी उद्धट बोलणे, अरेरावी यामुळे सुद्धा आमदार भोन्डेकर यांचेवर नाराजी दिसून आली.
आमदार भोन्डेकर 3 हजार कोटी निधी आणला, विकास कामे केली
आमदार भोन्डेकर 3 हजार कोटी निधी आणला, विकास कामे केली, पाच वर्ष सतत जनतेच्या अडचणी समजून घेतल्या परंतु सभोवतालच्या संधीसाधू, धूर्त लोकांमुळे जनता/मतदार दुरावले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. शेवटी भोन्डेकरांना, नानाजीचा मोठ्या प्रमाणात वापर करवा लागला. नानाजी च्या फवारणी मुळे किती प्रमाणत नाराजी दूर झाली, की फवारणी करणारांनी नानाजी दाबले, किती फवारणी केली हे निकाला नंतरच कळेल. तूर्तास तरी, निघाली आपली सीट…….. आपलाच विजय पक्का….