IndiaUncategorized

Nana Patole : नानासाहेब  पटोले यांचे नंतर डॉ. प्रशांत यादवराव पडोळे तिकिटाचे शर्यतीत आघाडीवर

डॉ. प्रशांत यादवराव पडोळे तिकिटाचे शर्यतीत

Nana Patole निर्वाचन आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाकडून तिकीट इच्छुकांनी तिकीटाची मागणी केली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात अनेकांनी तिकीटाची मागणी केली असली तरी प्रदेशाध्यक्ष आमदार नानासाहेब  पटोले यांचेनंतर डॉ. प्रशांत यादवराव पडोळे तिकिटाचे शर्यतीत आघाडीवर असल्याच्या मतदार संघात चर्चा होत आहेत. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशी तिकीट इच्छुकांचे गर्दीत वाढ होत आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात प्रदेशाध्यक्ष Nana Patole आमदार नानासाहेब  पटोले, माजी आमदार बंडूभाऊ  सावरबांधे, माजी आमदार  सेवकभाऊ वाघाये, जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. प्रशांत यादोराव पडोळे, रामलालजी चौधरी, सुभाषजी आजबले, धनराजभाऊ  साठवणे, विकासभाऊ  राऊत, प्रकाश पचारे, देवीलाल राहांगडाले यांनी जिल्ह्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नानासाहेब  पटोले सोडल्यास डॉ. प्रशांत पडोळे हे वरचढ ठरताना दिसत आहेत. त्यांना सहकार महर्षी स्वर्गीय यादवराव  पडोळे यांचे नावाचा फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ. प्रशांत पडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ता

डॉ. प्रशांत पडोळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वैद्यकिय सेवा दिलेली आहे. ते २००३ मध्ये कुणबी समाज भंडारा चे अध्यक्ष असतांना मागील १८ वर्षापासून भंडारा गोंदिया जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांना सहकार क्षेत्राचा अनुभव असून त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्हा दूध संघाची निवडणूक लढविली असून संचालक म्हणून काम पाहिले आहे. डॉ. प्रशांत पडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. कोरोना कालावधीत त्यांचे प्रशंसनीय कार्य वाखाणण्याजोगे होते. लोक प्रतिनिधी म्हणून मानवतेचे सेवा करणे व पृथ्वीचे रक्षण करण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत त्यांचेकडे आलेल्या गरीब रुग्णांना मदतीचा हात देण्यास ते मागे-पुढे पाहत नाही.

जनतेशी संपर्कही त्यांची जमेची बाजू

कोरोना कालावधीत त्यांनी अनेक रुग्णांवर नाममात्र दरात उपचार केले होते. ही त्यांची जमेची बाजू आहे. या शिवाय आमदार नानासाहेब  पटोले नंतर कार्यकर्त्यांसह जनतेशी संपर्कही त्यांची जमेची बाजू असून वडिलांनी केलेल्या कार्याचाही त्यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचे वाट्याला जर भंडारा-गोंदिया लोकसभा सीट आल्यास आणि प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे जर लोकसभा निवडणूक लढवत नसतील तर डॉ. प्रशांत पडोळे हे इतरांपेक्षा वरचढ असल्याने शर्यतीत आहेत म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काँग्रेसनेही वडिलांसह डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिलेल्या सेवेचा व केलेल्या कार्याचा विचार करून त्यांना लोकसभेची तिकीट देणे आवश्यक झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button