भंडारा:
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने राबविल्या जाणाऱ्या “माझी वसुंधरा अभियान ४.०” अंतर्गत ग्रामपंचायत बेला यांना राज्यस्तरावर व्दितीय पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराची रक्कम १.२५ कोटी रुपये आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये बेला ग्रामपंचायतीने सक्रियपणे भाग घेतला होता. अभियानातील सर्व निकष पूर्ण करून बेला ग्रामपंचायतने उत्कृष्ट कार्य केले आणि म्हणून शासनाने त्यांना १.२५ कोटींचा व्दितीय पुरस्कार नुकताच जाहीर केला.
यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. याचे श्रेय सरपंच शारदा गायधने (शेंडे), उपसरपंच अर्चना कांबळे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, पंचायत समिती सभापती रत्नमाला चेटूले, गट विकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, विस्तार अधिकारी प्रमोद हुमणे, प्रमोद तिडके, ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य रजनी बाभरे, मनिषा इंगळे, अर्चना पंचबुद्धे, सुप्रिया शेंडे, बबिता चवरे, वंदना कुथे, राकेश मते, विनोद नागपुरे, धनराज गाढवे, श्रीकृष्ण वैद्य, स्नेहल मेश्राम, सोपान आजबले, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पो.पा. श्रीराम भिवगडे, अध्यक्ष तं. मु. स. कन्हैया नागपुरे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट कॅडर, नवजीवन ग्रामसंघ, गार्गी प्रभाग संघ, महिला बचत गट, आणि संपूर्ण गावकरी बंधू-भगिनींना देण्यात येत आहे.