अब न कटेगा बहुजन ; अब न बटेगा बहुजन, सिर्फ जितेगा बहुजन
Bhandara Assembly Election विधान सभेच्या निवडणुकीचे प्रचारसभा, प्रचार फेरी, रोड शो, सर्व उमेदवाराकडून शक्ती प्रदर्शन करिता भाड्याने, मजुरी देऊन का होईना लोक जमवली जात आहे. आणी सभा सुरु होण्या अगोदरच मजुरी देऊन आणलेले लोक उठूनही जात आहेत. जनतेला लुभवण्या करिता विकासाच्या भूलथापा देत आहेत.
दलित मतांची मोठी टक्केवारी
भंडारा विधानसभेत (Bhandara) दलित मतांची मोठी टक्केवारी असून दलित समाजातील जनतेची मते कशी विभागली जातील या करिता अनेक क्लुप्त्या वापरण्याचा प्रयन्त प्रस्थापित नेत्यांकडून सुरु आहे. भंडारा विधान सभेत असाच प्रकार सुरु असून मत विभागण्याकरिता दलित समजातील अनेक अपक्ष उमेदवार आर्थिक पुरवठा करून उमेदवार उभे केले असल्याची चर्चा आहे. पण हा फंडा दलित समाजाला आधीच कळला असल्याने या समाजाने सावध भूमिका घेतली आहे. उलट या सौदागर लोकांनी समाजाची दिशाभूल करून किंमत लावण्याचा प्रयत्न केला त्याचा रोष जनतेत दिसून येत आहे.
लाडकी बहीणच निवडणुकीच्या रिंगणात
राज्यात महायुती (Mahayuti) कडून “लाडकी बहिण योजनेचा” (Ladki Bahin Yojna) गाजावाजा करून शासनाच्या पैस्यावर मते मागण्याचा फाजील उद्योग सुरु आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात प्रथमच महिला उमेदवार कांग्रेस पार्टी (महाविकास आघाडी) ने दिला आहे. नानाभाऊ पटोले (Nana Patole ) यांनी लाडकी बहीणच निवडणुकीच्या रिंगणात उतरवली आहे. खऱ्या अर्थाने नानाभाऊ (Nana Patole) ने “लाडकी बहिण योजना” राबवून महिलांचा सन्मानच केला आहे.
मते विभागण्याकरिता प्रस्थापित नेत्याने पेड उमेदवार निवडणुकीत उभे करून आपला कुटनीती वापरली, ती जनतेला कळून चुकली आहे. त्यातील तीन उमेदवार पेड असल्याची सगळीकडे चर्चा आहे. त्याचे पडसात २० तारखेला होणाऱ्या मतदानात नक्कीच दिसून येतील.