आध्यात्म, आत्मसन्मान, आदर, आस्था चे प्रतिक मानव धर्म
Bhandara Assembaly Election : महानत्यागी जुमदेवजी बाबा एक थोर समाज सुधारक म्हणून आज जगविख्यात झाले. त्यांनी मानव धर्माची शिकवण जगाला दिली. वाईट चालीरीती, अंधश्रद्धा या पासून जनतेला जागृत करण्याचे कार्य केले. कोणत्याही उपचारविना व्यसन मुक्त करून गरीब जनतेची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्याचे महान कार्य केले. सामजिक ऐक्य तथा मानवी जिवनातील अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती यावर मोठ्या प्रमाणावर कार्य केले. त्यांनी महाराष्ट्र बाहेर अनेक राज्यात पोहचविले अश्या अधायात्मिक व समाजसुधारक महापुरुषाला त्रिवार वंदन.
एक प्रकारे भ्रष्ट राजकारण्याकडून “मानव धर्माचीच” थट्टा
राजकारणी लोकांनी “परमात्मा एक सेवक” “मानव धर्म” चा स्वीकार हा राजकारणाचे साधन म्हणून स्वीकारले. त्याचा वापर सेवकांचे मतदान मिळविण्याकरिता करीत आहेत. याचे प्रत्यय जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. “मी एक सेवक” म्हणून लाउड स्पीकर च्या माध्यमातून प्रचार करीत आहेत. अनेक सेवकांच्या घरी १५०० रूपये असलेला लिफाफा देत आहेत, तर काही कार्यकर्ता यांच्या आमिषाला बळी पडून सेवकांची दिशाभूल करीत असल्याची जनतेत चर्चा आहे. काही दिवसा पूर्वी नेत्याच्या फॉर्म हाउस वर झालेल्या ओल्या पार्टी नंतर कार्यकर्त्यांना दोन वेळा प्रत्येकी १०-१० हजार रुपयाचे पाकीट दिल्याची चर्चा होती. हि बाब बाबांच्या निष्टावान सेवकांना व कार्यकर्त्यांना पटत नसून या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करीत आहेत. निष्ठावान सेवक, कार्यकर्ते हे अश्या भ्रष्ट, दारू पिणारा, खोटे बोलणारा, कमिशन खाणारा, १५ टक्के घेणाऱ्या नेत्याला मतदान न करण्याचे आव्हान करीत आहेत.
महान त्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या मार्गदर्शनात नेहमी बोलायचे “लाखोच्या संखेने सेवक व कार्यकर्ते तयार होतील पण काही मोजकेच कार्यकर्ते व सेवक मानव धर्माच्या रूपरेषे प्रमाणे वागतील याची मला जाणीव आहे. सेवक व कार्यकर्ता पैशाच्या आमीशाला बळी पडणार नाही हे तितकेच खरे.
भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम ।
महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम ।
।। परमात्मा एक ।।