भंडारा जिल्ह्यात “लाडकी बहिण व लाडकी सून”
Bhandara Election 2024 : भंडारा विधानसभेत सौ. पुजा ठवकर (गजभिये) कांग्रेस व नरेंद्र पहाडे (अपक्ष) यांच्यात थेट दुहेरी लढत. भंडारा जिल्ह्यात “लाडकी बहिण व लाडकी सून” चे राजकीय वारे वाहु लागले आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र पहाडे यांची त्सुनामी उग्र रूप धारण करून भोन्डेकर यांचे साम्राज्याला पद्धतशीर पणे सुरुंग लावले आहे. सुरुंग एवढा मोठा झाला की आत्ता थांबविणे कठीण झाले आहे.
“लाडकी बहिण व लाडकी सून” चा नवीन नारा जिल्ह्यात सुरु झाला असून सर्व दलित बौद्ध व कांग्रेसी, ओबीसी, कुणबी मतदार पुजा ठवकर (गजभिये) पाठीशी उभी असल्याचे चित्र दिसत आहे. भोन्डेकर यांनी पैश्याच्या जोरावर दलित बौद्ध मते विभागण्या करिता “महार बौद्ध” पैसे देऊन उभे केले पण हा प्रयोग त्यांच्याच अंगलट येत आहे. कारण त्यांची हि नेहमीची चाल जनतेनी ओळखली आहे. कांग्रेस च्या तिकीट न मिळालेल्या एका माजी जिल्हा अध्यक्षाला निवडणुकीत २ करोड रुपये चर्चा आहे. तर अजून काही निवडणुकीच्या रणांगणात उभे असलेले उमेदवार रात्री भोन्डेकर यांच्या कडे उर्वरित पैश्या साठी रांगा लावत असल्याचे समजते. परंतु दिवसेन दिवस पुजा ठवकर (गजभिये) यांची स्थिती अधिक बळकट होत आहे.
भ्रष्ट राजनीती व अहंकार याला जिल्ह्यातील भाजपा कंटाळलेली
नरेंद्र पहाडे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून उमेदवारी मागितली होती परंतु महाविकास आघाडीत हि तिकीट काग्रेस कडे गेल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. नरेंद्र पहाडे यांचा परिवार पूर्वाश्रमीचा संघ प्रचारक असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच भोन्डेकर यांच्या भ्रष्ट राजनीती व अहंकार याला जिल्ह्यातील भाजपा कंटाळलेली होती. त्यातच त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांचा चाहता, मानणारा मोठा वर्ग आहे पण त्यांच्या सुद्धा विरोधात अनेक वेळा उलट सुलट वक्तव्य केले त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज आहेत ते कुणाचीही मानायला तयार नाहीत. राष्ट्रवादी नेते दलाल साहेब यांच्या मुलावर व प्रसिध्द बिल्डर प्रभात गुप्ता यांच्या खोटे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. भाजपच्या तालुका अध्यक्ष यांच्या मुलावर सुद्धा खोटे गुन्हा दाखल केला होता त्यामुळे महायुती मधील दोन्ही भाजप – राष्ट्रवादी सहकारी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा खूप मोठा विरोध दिसून येत आहे.
भोन्डेकर ला पर्याय म्हणून नरेंद्र पहाडे समोर आले
नरेंद्र पहाडे यांना अपक्ष असल्यामुळे व संध निगडीत असल्यामुळे खूप मोठा फायदा होत आहे. त्याच प्रमाणे स्वभावाने शांत, कार्यकर्त्या साठी नेहमी मदतीला धावून जाणारे, सामाजिक कार्य या सुद्धा जमेच्या बाजू आहेत. त्याच प्रमाणे हिंदू दलित म्हणून भोन्डेकर ची चाल नेहमी खेळायचे त्यालाच काट हुकुम चा एक्का म्हणून नरेंद्र पहाडे कडे पहिले जात आहे. भोन्डेकर ला पर्याय म्हणून नरेंद्र पहाडे समोर आले आहेत. त्यामुळे भोन्डेकर आता तीन नंबर आलेले आहेत. आणी चार नंबर वर सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भोन्डेकर यांचे राजकारण पी.ए. बेस व ठेकेदार बेस आहे. त्यांचे
पी.ए. व ठेकेदार यांची काहीच राजकीय लायकी नसल्याचे बोलले जाते त्यामुळे भोन्डेकर यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होत आहे.
याचाच परिणाम म्हणजे भंडारा विधानसभेत सौ. पुजा ठवकर (गजभिये) कांग्रेस व नरेंद्र पहाडे (अपक्ष) यांच्यात थेट दुहेरी लढत पाहायला मिळत आहे.