भंडारा
Bhandara Government Medical College: जिल्ह्यातील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन आज नियोजन भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या शुभहस्ते आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे संपन्न झाले. या कार्यक्रमाला दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, माजी खासदार सुनील मेंढे, प्रभारी जिल्हाधिकारी आशा पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, अधिष्ठाता डॉ. विपुल अंबाडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
वैद्यकीय महाविद्यालयाची वैशिष्ट्ये:
- 100 विद्यार्थ्यांची क्षमता
- 430 खाटांचे रुग्णालय
- मौजा पलाडी येथे 25 एकर जागेचा सातबारा झाला आहे
- प्रवेश लवकरच सुरू होतील.
जिले में नए सरकारी मेडिकल कॉलेज का उद्घाटन आज नियोजन भवन में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और राज्यपाल सीपी राधाकृष्णन की अध्यक्षता में टेलीविजन प्रणाली से संपन्न हुआ.