भंडारा विधानसभेच्या 2024 निवडणुकीत महाभारताची शक्यता
Bhandara vidhansabha Election 2024 : भंडारा-पवनी मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोन्डेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. आमदार नरेंद्र भोन्डेकर पक्ष प्रवेशाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदार यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याची माहिती सुत्रा कडून प्राप्त झाली आहे. अपक्ष आमदार मुळे मतदारसंघात व महायुतीत अंतर्गत महाभारत सुरू आहे.
मागील २०२४ लोकसभा निवडणुकीत संजय कुंभलकर माजी नगर सेवक यांना बसपा कडून उमेदवारी घेऊन उभे केले होते. निवडणूक होताच त्यांचा शिंदे सेना मध्ये प्रवेश केला. कुंभलकर याने जवळपास २५ हजार मते घेऊन भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पडण्याचे काम केले. कुंभलकर हे तेली समाजाची मते वळविण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला.
२०२१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व सेने मध्ये युती होती, भाजपने अरविंद भालाधारे यांना भंडारा विधानसभा क्षेत्रातून अधिकृत उमेदवारी दिली होती तेव्हा नरेंद्र भोन्डेकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली व जिंकून आले. त्यावेळी गैर आंबेडकरी समाजाचा म्हणून कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, व भाजपा मधील काही जातीयवादी चिंधी चोर नेत्यांनी अपक्ष उमेदवार भोन्डेकर यांना मदत केली. २०१४ च्या निवडणुकीत सुद्धा भोन्डेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यात त्यांचा दारूण पराभव झाला होता व भाजपचे उमेदवार एडव्होकेट स्व. रामचंद्र पुनाजी अवसरे निवडून आले होते. भोन्डेकर यांना फक्त ४० हजार मते मिळाली होती.
दोन वेळेस भाजपा विरुद्ध बंडखोरी केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्या व नेत्यामध्ये मध्ये कमालीची नाराजी आहे. तसेच राज्याचे उप-मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्ह्याचे पालक मंत्री असताना बाहेरचा पालकमंत्री नको, त्यामुळे जिल्ह्याचा विकास होत नाही असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे सुद्धा भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. मागील दगाबाजीचा वचपा काढण्याचा भाजपचा नेत्यांनी मन बनविला आहे. जर शिंदे गटा अपक्ष आमदार भोन्डेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यास भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात महाभारत रंगणार हे मात्र नक्की.