Bhandara Vidhansabha Election : सांसदीय लोकशाही मध्ये निवडणुका हा एक राष्ट्रीय सण, उत्सवच म्हणावा लागेल. देशाची जनतेची सेवा, कामे करण्या करिता, विकास करण्याकरिता राजकीय नेते मंडळी आश्वासनाचा, विकास करण्याचा संकल्प याचा महापूर महापूर आलेला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून नेत्यांनी भ्रष्टाचार, जबरन वसुली, खंडणी, नेत्यांची पक्षीय खरेदी विक्री, स्वःताची ठेकेदारी यातून कमविलेल्या पैसा याला आर्थिक चालना मिळते त्यातून जनतेला सुद्धा थोडाफार आनंद उपभोगता येतो.
मात्र निवडणुकी नंतर ज्या मतदारांनी, जनतेने निवडून दिले याचा विसर राजकीय नेत्यांना पडतो. ते जनतेचे केवळ प्रतिनिधी आहेत, त्यांचे साहेब किंवा मालक नव्हेत त्यातल्या त्यात राजे- महाराजे तर बिलकुलच नाही. त्याहून त्यांचे भिकारचोट पी. ए. यांचा माज तर पाहण्या सारखाच असतो. त्याच्यातील ढोंगी मगरच्छ जागृत होऊन भ्रष्ट्राचारी राक्षसाचा विक्रार रूप धारण करतो. आणी जनतेकडे त्याला पाच वर्ष झेलण्या पलीकडे काहीच उरलेले नसते.
भ्रष्ट्राचारी राक्षसाचा विक्रार रूप धारण
राजकीय नेत्यांनी भ्रष्ट्राचारी राक्षसाचा विक्रार रूप धारण केले आहे. निवडणुकीत भ्रष्ट्राचारातून कमविलेल्या पैशाची उधळण सुरु आहे त्याला फवारणी असे गोंडस नाव दिले आहे. मागील काळात जिल्ह्यात पोलीस पाटील भरती झाल्यात, त्यांत त्यांनी प्रत्येकी ८ लक्ष एका उमेदवारा कडून घेतले असल्याच्या चर्चा आहेत. त्या नंतर कोतवाल भरती मध्ये सुद्धा तेच केले म्हणत आहेत. भंडारा जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शासनाने धान खरेदी केंद् बेरोजगार सहकारी संस्था, राईस मिल, विविध कार्यकारी संस्था यांना दिले त्यांचे कडून १० लक्ष रुपये घेतले गेले असल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून वसुली करणे, न दिल्यास एखाद्या गुन्हात फसविणे, निलंबनाची धमकी देणे, बदली करणे, पैसे घेऊन अधिकारी आणणे व हवे तसे त्यांचे कडून कामे करून घेणे असले गोरखधंदे सुरु केले असल्याची माहिती मिळत आहे.
भ्रष्ट राजीकीय नेत्यांना हद्दपार करणे गरजेचे
बेरोजगार युवकांना शासनाने शिव भोजन केंद्र दिले पण त्याचे कडून २० हजार महिना कमिशन घेतले जाते, कमिशन न देणाऱ्या बेरोजगार युवकांचे शिव भोजन केंद्र बंद पाडले. विकासाच्या थापा मारून “४ हजार कोटी” निधी खेचून आणला असे सांगतात पण जनता गेले “कोटी” असा प्रती प्रश्न विचारात आहे. ४ आलेशन महागड्या गाड्या अनेक भंडारा नागपूर व मुंबई येथे बिल्डिंगस, इमारती,फ्लाटस, भाच्याच्या व बहिणीच्या नावे ३०० एकर शेतजमीन खरेदी केली, 3 राईस मिल, अनेक फेक, बोगस, शेल प्राईव्हेट लिमिटेड कंपन्या तयार केलेल्या आहेत. अश्या भ्रष्ट राजीकीय नेत्यांना हद्दपार करणे गरजेचे आहे असे जनतेचे मत आहे. हि ताकत घटनाकारांनी निवडनुकीतील मतदानाच्या अधिकारातून दिली आहे. त्याची खरी वेळ आलेली आहे म्हणून लोकशाहीत निवडणुका हेच हिशेब चुकता करण्याचे एकमेव साधन आहे त्याचा वापर जनतेला कराण्याचा जनतेणे मन बनविला असल्याचे चित्र आहे.