Bhandara-ZP-Election

प्रस्थापित नेत्यांमध्ये काटसहाचे राजकारण • काँग्रेस व विकास फाउंडेशन च्या युतीची शक्यता

भंडारा :

Bhandara ZP Election : महविकास आघाडीतील घटक पक्षांनी जिल्हा परिषदेची निवडणूक स्वतंत्र लढविली असली तरी निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याचा अलीखित करार झाला होता. पण नगर पंचायत आणि पंचायत समिती सभापती निवडणुकीत महाआघाडीतील काही घटक पक्षांनी विरोधकांची मदत घेऊन सत्ता स्थापन केल्याचे निदर्शनास असल्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेत माजी आमदार चरण वाघमारे किंग मेकर बनून काँगेस आणि विकास फाउंडेशन च्या युतीची शक्यता Bhandara ZP Election वस्तविण्यात येत असून काँग्रेस चे मोहन पंचभाई अध्यक्ष तर विकास फाउंडेशन कडे उपाध्यक्ष पद जाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Bhandara ZP Election डॉ. परिणय फुके व माजी आ. चरण वाघमारे यांच्यात गटबाजीला उधान

ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती ची सार्वत्रिक निवडणूक २ टप्प्यात पार पडली. ५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत काँग्रेस चे २१ , राष्ट्रवादी काँग्रेस १३ , भाजपा १२ , बसपा १ , वंचित बहुजन  आघाडी १ , शिवसेना १ , अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. महविकास आघाडीतील घटक पक्षांतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची युती Bhandara ZP Election होऊन सत्ता स्थापन करतील असे समीकरण गृहीत धरले जात होते. पण मोहाडी नगर पंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके व माजी आमदार चरण वाघमारे यांच्यात गटबाजीला उधान येऊन शह काटशहाच्या राजकारणामुळे मोहाडी नगर पंचायत वर आ. परिणय फुके यांचे गटाचे ४ नगर सेवक असतांनाही नगराध्यक्ष पदी विराजमान झाले.

पण विषय समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाशी हात मिळवणी करून जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांपैकी ४ मध्ये सभापती विराजमान करण्यात यश मिळविले.

राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र

         या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महाआघाडीतील घटक पक्ष शह देत होते.  तर भाजपात माजी आमदार चरण वाघमारे यांची गोची केली जात होती. चरण वाघमारे यांचे कट्टर समर्थक आणि विकास फाउंडेशन समर्थित ६ जिल्हा परिषद सदस्य चरण वाघमारे यांचे कडे आहेत. राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने काँग्रेस आणि विकास फाउंडेशन यांच्या युतीचे नवे समीकरण अस्तित्वात येण्याच्या जिल्ह्यात चर्चा होत आहेत. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी २७ सदस्यांची आवश्यकता आहे. काँग्रेस २१ , विकास फाउंडेशन ६ , वंचित व अपक्षांची मदत घेतल्यास बहुमताचा आकडा पार होतो.

Bhandara ZP Election त्यामुळे ह्या शक्यतेस बळ मिळत आहे. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस च्या लक्षात आल्याने त्यांनी काँग्रेस सोबत युतीसाठी हात पुढे केला असल्याचे विश्वसनीय वृत्त असले तरी “पुढच्यास ठेस मागचा शहाणा” या युक्ती प्रमाणे वाटचाल झाल्यास विकास फाउंडेशन व काँग्रेस चीच जिल्हा परिषदेत सत्ता येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. असे समीकरण बनल्यास काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डॉ. मोहन पंचभाई असणार अध्यक्ष जि.प.पदाचे उमेदवार

डॉ. मोहन पंचभाई हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष असून ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्रातून जि. प. सदस्य म्हणून निर्वाचित झालेले आहेत. ते मनमिळाऊ असून त्यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये जिल्ह्यात अनेक यशस्वी आंदोलने केली असून त्यांचा राजकारणाचा दांडगा अनुभव पाहता अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले माजी जि. प. उपाध्यक्ष रमेश पारधी , माजी सभापती प्रेम वनवे यांना मागे टाकून मोहन पंचभाई च काँग्रेस चे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी माहिती पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.