Bhandara-ZP-Election

बाकी क्रमशः पुढील पोस्ट मध्ये……. Wiat…….

भंडारा :

Bhandara ZP Election भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पद निवडणुकीचा निकाल क्षणां क्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडी व समीकरणे, आपसी मतभेद, भाजपची गोचीड नीती, तसेच राष्ट्रवादीची बेशरम युती यामुळे जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्ते यांचा भ्रम निरास करणारा ठरला. जिल्ह्याच्या राजकारणात खा. मा. प्रफुल भाईजी पटेल हे मुंबई वरून शेळ्या हाकतात. भंडारा गोंदिया चा राजकीय कारभार त्यांचे दोन राजकीय दिवाणजी यांच्यावर सोपवूनच आपली जबाबदारी झटकतात. या दिवाणजीची जनते मध्ये प्रतिमा अत्यंत धुरकट आहे. कित्येक वेळा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याचा फटका खा. प्रफुल भाईजी पटेल यांना नेहमीच बसत आलेला आहे. नेहमीच ते जनतेच्या आणी कार्यकर्त्यांच्या तक्रारी कडे काना डोळा करतात.

Bhandara ZP Election नानासाहेब पटोले यांना सुद्धा “दिवाणजी” व्हायरस ची लागण

“दिवाणजी” व्हायरस ची लागन ज्या राजकीय पक्षाला किंवा  नेत्याला झाली कि कार्यकर्ते व जनतेचा सत्यानाश  नक्की समझायचा. आ. पटोले सुद्धा याला बळी पडले. यांनी सुद्धा दोन दिवाणजी ठेवले. त्यांचे कडे भंडारा जिल्ह्याचा राजकीय कारभार सोपवून जिल्हयाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. ज्या दिवाणजी चे राजकारण, पक्ष, कार्यकर्ते यांचेशी काही देणेघेणे नाही यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविली. दिवाणजी चा एकमेव उद्धिष्ठ चमचेगिरी करून पैसे कमविणे, नेत्याची दिशाभूल करणे, ओळखीचा फायदा घेऊन ठेकेदारीची कामे लाटून घेणे, आमदार फंडाचे काम मर्जीतील ठेकेदारांना देऊन कमिशन खाणे एवढेच आहे. त्याचा फटका त्यांना येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत बसला तर नवल होणार नाही.  अश्या मतलबी दिवाणजी मुळे नानासाहेब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पण दैव बलवत्तर म्हणून यांचे प्रखर विरोधी माजी आमदार चरणभाऊ वाघमारे “भगवान श्रीकृष्णा” वेळेवर  धावून आले आणी नानासाहेब याच्या राजकीय भविष्य समोरील काळोख नष्ट झाला, थोडक्यात बचावले म्हणायला काही हरकत नाही.    

भंडारा जिल्हा परिषदेवर कांग्रेस व विकास फाउन्डेशन सत्ता

जिल्हा परिषद निवडणूक मध्ये कांग्रेस पार्टी ला २१ जागा मिळाल्या त्यात सर्वाधिक पवनी क्षेत्रात 9 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी कांग्रेस ला एकूण 13 जागा जिंकता आल्या, भाजपा ला १२ जागा जिंकता आल्या, शिवसेना १, वंचित आघाडी १, बसपा १ अपक्ष ४ असे संख्याबळ समीकरण होते. राज्यात आघाडी सरकार असल्याने कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस व शिवसेना मिळून सहज सत्ता स्थापित केली गेली असती पण नानाभाऊ व भाईजी यांचा इगो आड आला. पहले आप… पहले आप… म्हणताना गाडी केव्हा सुटून गेली या कडे दोघांचे मुळीच लक्ष नाही. याच संधीच्या शोधात असलेला लबाड दबा धरून बसलेलाच होता त्याने संधीचे सोने केले.

भाजपा मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढलेले माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी भाजपात प्रवेश केला पण नेहमीच त्यांना वाईट वागणुकीचा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे अधिकच त्रस्त होते. त्यांनी मोहाडी-तुमसर विधान सभा क्षेत्रात सर्वाधिक ६ जागा जिंकून आणल्या होत्या. त्याच्या जवळ मोठी कार्यकर्त्यांची फौज असून ते कोणत्याही राजकीय वादळाचा सामना करण्यास सक्षम आहेत.

कांग्रेस पार्टी चे २१ संख्या बळ व विकास आघाडी चे  ६ असे २७ च्या जादुई आकडा सहज पर केला  यामुळे जिल्हा परिषदेत या युतीचे अध्यक्ष म्हणून वेळेवर नाट्य घडवून आणून, भाजपा बरोबर जाण्याच्या धमक्या देऊन  माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे यांचे बहिण जावई गंगाधर जिभकाटे विराजमान झाले.  गंगाधर जिभकाटे यांची माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे यांचे बहिण जावई असण्याशिवाय कोणतीच पात्रता नव्हती. शेवटी परिवार प्रेम, परिवारवाद आड येऊन कांग्रेस पार्टी च्या १९ सदस्यांनी  जिल्हा अध्यक्ष डॉ. मोहन पंचभाई यांना समर्थन दिले असताना जिल्हा परिषद अध्यक्ष पदा पासून वंचित राहावे लागले. त्याचा रोश कार्यकर्त्यांच्या, पदाधिकार्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसत होता. ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकास आघाडी कडून संदीप टाले यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली

माजी आमदार चरणभाऊ वाघमारे ठरले राजकारणाचे केंद्र बिंदू   

कार्यकर्त्यांसाठी साठी झटणारा नेता म्हणून परिचित असलेले चरणभाऊ राजकारणाचे खरे केंद्र बिंदू ठरले  त्यांनी कशाचीही परवा न करता तुमसर पंचायत समिती मध्ये कांग्रेस ची मदत घेत सत्ता स्थापित केली. कांग्रेस ला दिलेलेला शब्द पाळत कांग्रेस ला जिल्हा परिषद मध्ये मदत केली. त्याआधी त्यांच्यावर अनेक प्रकारे दबाव, धमक्या, प्रलोभने देण्यात आली पण भाजपा जवळून ओळखत असल्यामुळे त्याला बळी पडले नाहीत. त्यांच्या सदस्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचे आमिष दिल्याची चर्चा लोकामध्ये आहे. चरणभाऊ यांना आत्ता पासून लेखी आमदारकीचे तिकीट व निवडणुकीत येणारा संपूर्ण खर्च व विरोधात म्हणेल डमी उमेदवार देऊ केले होते. त्यांना भूलथापा देण्याकरिता  माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्रजी फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री मा. प्रफुल भाईजी पटेल, माजी उर्जा मंत्री व आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे आले पण चरणभाऊ जुमानले नाहीत. आणी खऱ्या अर्थाने किंग मेकर बनून भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले.

बाकी क्रमशः पुढील पोस्ट मध्ये……. Wiat…….

Leave a Reply

Your email address will not be published.