आपल्याच जातीचे दोन्ही अध्यक्ष व उपाध्यक्ष उमेदवार व गटनेता देणे म्हणजे जातीय पसरून भेदभाव करण्याचा प्रकार

BJP support NCP आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे  यांची पत्रकार परिषद म्हणजे भंडारा जिला भाजप संगठन मधील सुरु असलेली व्यक्ति विशेष अहंकारी कुवृत्ती ची पाठराखण करणे आहे कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचेशी हातमिळवणी केली म्हणत माजी आमदार चरण वाघमारे यांना पक्षातुन निलंबित केले, हे अतिशय हास्यास्पद आरोप फक्त डॉ. परिणय फुके यांचा अहंकार सांभाळण्यासाठी करत माजी आमदार चरण वाघमारे यांना निलंबित केले. राष्ट्रवादी कांग्रेस ने प्रधानमंत्री मोदीजी सह भाजप प्रदेश नेत्यांची किती खालच्या स्तरावरुन शिविगाळ सारखी भाषा वापरली, हे सर्व आज प्रदेश भाजप नेते विसरले का ? आणि विसरले  असतील तर कशासाठी, फक्त एका व्यक्ति चा अहंकार सांभाळण्यासाठी काय ?  यांना पक्षनिष्ठ म्हणावे कि आणखी काय ? चरणभाऊ वारंवार होत असलेला अपमान सहन करुनही पक्षासाठी सतत कार्य करत राहले.  

BJP support NCP डॉ. फुके यांना पक्षाचे हिता पेक्षा चरण वाघमारे यांचे राजकीय अस्तित्व संपविने हा उद्देश्य

भंडारा जिल्हयात राजकीय लढत बघीतली तर भाजपला राष्ट्रवादी कांग्रेस विरोधातच  लढावे लागते. यामुळेच चरणभाऊ यांनी राष्ट्रवादी कांग्रेस ऐवजी कांग्रेस सोबत युती करने हा भाजप हिताकरिता योग्य पर्याय चरण वाघमारे यांनी निवडला, त्या करिता त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे होते. भाजप प्रदेश नेत्यांना मोदिजी यांचे सन्मानाची जर खरी काळजी असती तर चरण वाघमारे सह  कोनत्याही पक्षाला समर्थन न देता भाजप ने विरोधी  बाकावर बसन्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करत तटस्थ राहण्याची भुमीका घ्यायला हवी होती BJP support NCP. परन्तु हे शक्य नव्हते कारण हे डॉ. परिणय फुके यांना हे मान्य नव्हते, कारण डॉ. फुके यांना पक्षाचे हिता पेक्षा चरण वाघमारे यांचे राजकीय अस्तित्व संपविने हा उद्देश्य साध्य करायचा होता.

परंतु त्यात स्पेशल अपयशी ठरले. त्यामुळे राजकीय चातुर्य उघड पडले. कदाचित् त्यांना जिंकल्यासारखे वाटतही असेल, पण त्यांनी विसरु नये चरण वाघमारे “मास लिडर” जन सामान्यांचा नेता आहे,  चरण वाघमारे एक योद्धा आहे,  हजारो कार्यकर्त्याना पक्षातुन काढले तरी  भाजप चे मौलिक सिद्धांत न सोडता सर्व कार्यकर्ते चरण वाघमारे यांचे सोबत खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास विकास फाउन्डेशन च्या कार्यकर्ते व चाहत्या मध्ये आहे. माझ्या या पोस्ट मुळे मला पक्षातुन काढतील परन्तु चिंता नाही भाजप चे सिद्धांत माझी ताकत आहे, चमचेगिरी कधी केली नाही, करणारही नाही असे मुकेश थानथराटे भाजप जिला उपाध्यक्ष, भंडारा यांनी ठणकावून सांगितले.

येणारी प्रत्येक वादळे हि आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात : चरणभाऊ वाघमारे

आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे, कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान, त्यातुन जागी होते जिद्द… आणि मग ऊभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस… येणारी प्रत्येक वादळे हि आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात..!!

राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला त्यांना निलंबित का करण्यात आले नाही ?

राज्यातील महाविकास आघाडीत कधीही शक्य नसलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आलेत. भाजपाला सत्तेपासून दूर सारण्यासाठी तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी केली. म्हणजेच ते तिन्ही भाजपाचे शत्रू पक्ष आहेत. भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळेच काँग्रेसचा जिल्हा परीषद ध्यक्ष बनला. भाजपचा जि. प. उपाध्यक्ष बनला. असे असतानांही माजी आमदार चरण वाघमारे यांना निलंबित करण्यात आले. मग भाजपचे शत्रुपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला त्यांना निलंबित का करण्यात आले नाही? असा प्रश्न भाजपमधील काही लोकांकडून उपस्थित केल्या जात आहे.

गटनेता निवडण्यापासून सुरुवात कट कारस्थानाची सुरवात

मागील विधानसभा निवडणुकीत चरण वाघमारे यांनी आमदार असतांना अतिशय चांगले काम केले. भावी विधानसभा उमेदवार म्हणूनही त्यांना मोठी पसंती होती. असे असतानाही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तरीही निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांनी भाजपचेच काम केले. जि. प. गटनेता निवडतानांही त्यांचे अत्यंत विश्वासू व जि. प. मध्ये सभापती राहिलेले संदिप टाले यांचेकडे दुर्लक्ष करुन नवख्या विनोद बांते यांना गटनेता निवडण्यात आले. तेव्हापासूनच चरण वाघमारे नाराज आहेत.

एकाच कारणासाठी चरण वाघमारे यांचे निलंबन तर डॉ. फुके का नाही ?

मोहाडी नगरपंचायत निवडणुकीत चरण वाघमारे यांना हाच अनुभव आला. संदीप टाले यांना जिल्हा परीषद उपाध्यक्ष बनविण्यासाठी त्यांनी डावपेच आखले. त्यात ते यशस्वी झाले. भाजपचाच उपाध्यक्ष बनला. असे असतानाही त्यांना निलंबित करण्यात आले. भाजपच्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शत्रू पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाची यूती केली. तेथेही भाजपचा उपाध्यक्ष बनणार होता. चरण वाघमारे यांनीही शत्रू पक्ष असलेल्या काँग्रेसशी युती केली. भाजपचाच उपाध्यक्ष बनला. मग चरण वाघमारेच यांचेच निलंबन का ?  ज्यांनी शत्रू पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली त्यांचे निलंबन का नाही ? असा प्रश्न निलंबित न झालेल्या एक भाजप पदधिका-याने उपस्थित केला. चरण वाघमारे यांना निलंबित केल्याने भविष्यात भाजपात मोठी दुभळी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published.