भंडारा :
Bombay High Court Judge : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांचा गौरव सोहळा आगामी कार्यक्रम वेदा लॉन्स, राज्य महामार्ग क्र. 06, भंडारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
संघर्षाची गाथा सर्वांना प्रेरणा देणारी आणि अनुकरणीय
न्यायमूर्ती श्री. यनशिबराज गो. खोब्रागडे (Y.G. Khobragade) हे भंडारा जिल्ह्याचे एक अनमोल रत्न मानले जातात. लाखनी तालुक्यातील रेंगेपार या दुर्गम गावातून आलेल्या अत्यंत कष्टाळू परिस्थितीतून त्यांनी जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर न्यायमूर्ती पद गाठले आहे. त्यांची संघर्षगाथा हे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी जो संघर्ष केला, तो केवळ वेदनेचा नवसृजन करणारा आणि कारुण्यपूर्ण होता. या संघर्षाची गाथा सर्वांना प्रेरणा देणारी आणि अनुकरणीय आहे.
विविध अतिथींचा सहभाग
हा गौरव सोहळा न्यायमूर्ती श्री. भूषण गवई (Bhushan Gavai) (सर्वोच्च न्यायालय) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला जाणार आहे. यामध्ये मान्यवर अतिथी म्हणून न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे (सर्वोच्च न्यायालय), मुख्य न्यायमूर्ती देवेन्द्रकुमार उपाध्याय (मुंबई उच्च न्यायालय), ज्येष्ठ न्यायमूर्ती रविंद्र घुगे (मुंबई उच्च न्यायालय), वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे (Nitin Sambare) (नागपूर खंडपीठ), तसेच पालक न्यायमूर्ती अनिल पानसरे (भंडारा) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात वकीलवृंद, कर्मचारी आणि विविध अतिथींचा सहभाग असणार आहे.
विशेष उपस्थिती
उच्च न्यायालय, मुंबई नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ ( Aurangabad Bench) येथील सन्माननीय न्यायमूर्ती बार कौंन्सील ऑफ महाराष्ट्रचे सन्माननीय पदाधिकारी, अॅड. संग्राम देसाई (अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा), अॅड. पारिजात पांडे (पालक सदस्य, भंडारा जिल्हा बार कौन्सील) यांची राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभातकुमार मिश्रा, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, (Bar Association) भंडारा. राजेश गो. अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, भंडारा यांनी केले आहे.