Dr.-Parinay-Fuke-MLA

*आ. डॉ.परिणय फुके चे तीन बळी 

 Dr. Parinay Fuke MLA : तडफदार आमदार डॉ. परिणयजी फुके यांनी सभागृहात भेदक मारा द्वारे भंडारा एसडीओ रविंद्र राठोड यांच्या रेती माफिया बरोबर असलेले आर्थिक सालेलोटे यावर  तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर एसडीओ रविंद्र राठोड यांची विकेट जात नाही तेच आणखी दोन महसूल अधिकारी आमदार डॉ.परिणयजी  फुकें यांच्या रडार आले आहेत. त्यामुळे सभागृहात भंडारा जिल्ह्यातील आणखी दोन महसूल अधिकाऱ्यांचा नंबर लागला आहे. सभागृहाद्वारे पुन्हा दोन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होणार असून चौकशीनंतर जिल्ह्यातील ३ महसूल  अधिकारी निलंबित होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मुंबई येथे  सुरू असलेल्या अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील ३ भ्रष्ट महसूल अधिकारी सभागृहाच्या रडार आले असून विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुकेंनी  सभागृहात दिलेल्या पुराव्यांच्या पेन ड्राइव बाउन्सर ने आता ३ महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होणार,  हे जवळपास निश्‍चित झाले आहे. लवकरच जिल्ह्यात एकाच वेळी तीन महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याने भंडारा जिल्ह्यात महसूल विभागात किती मोठा भ्रष्टाचार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले

Dr. Parinay Fuke MLA : वाळू माफियांची नजर नेहमीच वैनगंगेच्या रेती वर

भंडारा जिल्ह्याल वैनगंगा नदीच्या वाळूला पूर्व विदर्भात भरपूर मागणी आहे. वाळू माफियांची नजर नेहमीच वैनगंगेच्या रेती वर असते. कमी वेळात मालामाल होण्याचा महा मार्ग या नदीच्या वाळू मार्गातून जातो. त्यामुळे वाळू माफियांसोबत महसूल विभागाचे अधिकारीही यामध्ये गुंतलेले आहेत. भंडारा जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचे वाळू माफियांसोबत असलेले साटेलोटे आता त्यांच्यावर उलटायला सुरुवात झाली आहे. बहुचर्चित वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यासह अजून एका अधिकाऱ्याबाबत डॉ.फुके यांनी सभागृहात तारांकित प्रश्न विचारला होता. पुन्हा एका महसूल अधिकाऱ्याच्या कारनाम्यावर सभागृहाच्या प्रश्नावली तासिकेत आमदार फुके प्रश्‍न विचारला आहे.

सभागृह भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी लावणार आहे. ज्या अधिकाऱ्याचा मुद्दा प्रश्नावली तासिकेत सभागृहाच्या रडारवर आल्या आहेत, त्याच्यावर आपल्या कार्यकाळात वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर कोणतीही कारवाई न करता त्या वाहनांना सोडून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावल्याचा आरोप आहे. यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याच्या आरोप करण्यात आला आहे. यासाठी आमदार फुके यांना पवनी येथील एका भाजप कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती पुरविल्याचे चर्चा आहे. संबंधित अधिकाऱ्याने २५ ते ३० वाळूचे टिप्पर कारवाई न करता सोडल्याची माहिती, माहिती अधिकारात मिळाली आहे. त्यामुळे आजच्या प्रश्नावली तासिकेत संबंधित अधिकाऱ्याची पोलखोल होणार आहे.

Dr. Parinay Fuke MLA : तस्कराच्या ६ गाड्या सोडल्या

एसडीओ रविंद्र राठोड  महसूल अधिकाऱ्याने वाळू माफिया असलेल्या मित्राचा पक्ष घेत अवैध वाळू वाहून नेत असलेल्या तस्कराच्या ६ गाड्या एप्रिल २०२१ मध्ये या सोडल्या प्रकरणी सभागृहात केल्या गेलेल्या आरोपानंतर भंडाऱ्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी भूगावकर यांनी त्या वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. त्याचा अहवालही लवकर येणार आहे. त्यामुळे त्या वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर कारवाई होणार, हे जवळपास निश्‍चित झाले असताना आणखी २ महसूल अधिकारी सभागृहाच्या रडारवर येणे ही बाब जिल्ह्यासाठी निश्‍चितच योग्य नाही. शेवटी आता ३ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन हे जवळपास निश्‍चित आहे

One thought on “Dr. Parinay Fuke MLA : सभागृहाच्या पिच वर आ. डॉ. परिणय फुके यांची भेदक गोलंदाजी”

Leave a Reply

Your email address will not be published.