खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल !
Dr. Prashant Padole,MP : भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर (५३) होणाऱ्या वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी भंडारा फुलमोगरा ते पलाडी या 14.5 किमी लांबीच्या बायपाससाठी 470 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बायपासमध्ये अनेक अंडरपास तसेच गावांना जोडणारे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, या रस्त्यांच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी खासदार डॉ. प्रशांत पडोळे Dr. Prashant Padole यांच्याकडे आल्या होत्या.
खासदार डॉ. पडोळे यांनी प्रत्यक्ष बायपास रोडवर भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. कवडसी फाटा परिसरात रस्त्याच्या कडांवर मोठमोठे खड्डे पडलेले दिसून आले असून, अद्याप त्यांची दुरुस्ती झाली नव्हती. खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, रस्त्यांमुळे काही युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. निरीक्षणा दरम्यान, खासदारांना रस्त्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना काम सुधारण्याचे कठोर आदेश दिले.
रोडच्या निकृष्ट बांधकामावर खासदार पडोळेंची कारवाई, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना फटकारले
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील बायपास रोडच्या कामात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. रस्त्याच्या बाजूच्या मातीवर ठेवलेल्या मोठ्या गोट्यांखालील माती पावसाच्या पाण्याने वाहून गेली असून, कोरंभी परिसरातील क्रॉस बॅरियर एका बाजूला वाकलेले आहे. त्यामुळे रहदारी सुरू झाल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.या परिस्थितीमुळे खासदार डॉ. प्रशांत पडोळे प्रचंड संतापले. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन बांधकाम कंत्राटदारांना जबाबदारीसाठी धारेवर धरले. मात्र, कंत्राटदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, तर संबंधित अधिकाऱ्यांचा प्रतिसाद निष्क्रिय असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे खासदारांनी नॅशनल हायवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
बांधकामातील त्रुटी :
- अनेक ठिकाणी सुरक्षा भिंती वाकलेल्या स्थितीत असून त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत.
- रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत, ज्यामुळे वाहनधारकांसाठी धोका वाढला आहे.
- अनेक भागांत रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण असून, जानेवारीत रस्ता सुरू करण्याचा उद्देश आता धोक्यात आला आहे.
यावेळी खासदार डॉ. पडोळे यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, अजय मेश्राम, तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. कामाच्या दर्जावर झालेली टीका ऐकून कंत्राटदार स्तब्ध झाले, आणि उडवाउडवीची उत्तरे दिली.
तत्काळ कार्यवाहीची अपेक्षा :
या घटनांमुळे संबंधित बांधकाम कंत्राटदारांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच कामाचा दर्जा सुधारण्यासाठी नॅशनल हायवे अधिकाऱ्यांकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
MP Dr. Prashant Padole gave a stern message to the officials!
Dr. Prashant Padole directs to immediately repair poor quality construction