सेवा निवृत्त वडील स्व. भोजराज भोन्डेकर, अध्यक्ष व भाचा आशिष चवळे हा सचिव
कर्ज व थकीत कर्जाची रक्कम ९.५० करोड असल्याची माहिती
Financial Scam : एन.बी.बी. (नरेंद्र भोजराज भोन्डेकर) मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, धारगाव चामडा कारखाना, चे १०० % थकीत असल्याची प्रेस नोट बातमी सोसिअल मिडिया वर वायरल होत आहे. जाणून घेऊ काय म्हटले आहे प्रेस नोट मध्ये……………..
“अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे” या योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील सभादांसाठी सहकारी तत्वावर संस्था उभारणी करण्यासाठी समाजकल्याण विभागाने राज्यात अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर केले होते. त्या अंतर्गत आमदार नरेंद्र भोन्डेकर यांनी एन,बी.बी. (नरेंद्र भोजराज भोन्डेकर) मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था ता.जी. भंडारा या नावाने “कातडी कमावणे” चामडा कारखाना, नवेगाव (रीठी), धारगाव येथे संस्थेच्या नावे सुरु केला. संस्थेचे सर्व डमी संचालक/मालक या मध्ये त्यांचे सेवा निवृत्त वडील स्व. भोजराज भोन्डेकर व आमदार नरेंद्र भोन्डेकर यांचा भाचा आशिष चवळे हे अध्यक्ष, सचिव व ५१ बोगस सभासद दर्शिवण्यात आहेत.
कर्ज व थकीत कर्जाची रक्कम ९.५० करोड असल्याची माहिती
या उद्योगा अंतर्गत ७०० लोकांना रोजगार उपलब्ध द्यावयाचा होता. प्रकल्प काही दिवस नाममात्र, दिखाव्या करिता सुरु केले व बंद केले. संस्थेने प्रकल्पाची किंमत ६,९४,५०,००० (सहा करोड चौरयान्नव लाख, पन्नास हजार) दर्शवून समाज कल्याण विगागा कडून कर्जाची उचल केली. आणी आज पर्यंत एकही शासनचा पैसा परतफेड केला नाही. सर्व कर्ज थकीत आहे. जवळ पास कर्ज व थकीत कर्जाची रक्कम ९.५० करोड असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
वडील सेवा निवृत्त असताना,त्याची प्रकृती चांगली नसताना त्यांना संस्थेचे अध्यक्ष बनविले व भाच्याला सचिव बनवून पैशाची अफरा तफर केली, योजनेचा पैसा खाल्ला, व शासनाची फसवणूक केली. आता त्या चामडा कारखान्याच्या ठिकाणी आलेशन फार्म हाउस, स्विमिंग टांक, आणी राजकीय पार्ट्या केल्या जातात. सदर चामडा प्रकल्प हे आमदार नरेंद्र भोन्डेकर यांच्या ताब्यात असून त्याचे चालक मालक आहेत.
चामडा प्रकल्प धारगाव वर कारवाही ची मागणी
१) शासनाने एन.बी.बी. (नरेंद्र भोजराज भोन्डेकर) चामडा प्रकल्पाची जागा ताब्यात घ्यावी.
२) सेवानिवृत्त वडील यांच्या नावे व बोगस सभासद यांचे नावे कर्जाची उचल केली त्याची आर्थिक
गुन्हे शाखा कडून गुन्हा दाखल करून चौकशी करावी.
३) संस्थेचे लेखा अंकेषण (आडीत), GST, इन्कम टक्स रिटर्न, खरेदी-विक्री कच्चा माल व पक्का
माल, काम करणारे कर्मचारी यांचे PPF, कर्मचारी विमा वैगेरे तपासण्यात यावा.
अशी प्रेस नोट आमदार नरेंद्र भोन्डेकर याचे भ्रष्ट्राचार उघड करणारी बातमी वायरल होत आहे. हे अतिशय गंभीर आहे. जर जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधीच असा शासनाच्या योजनेचे करोडो रुपये खात असेल तर याला पुन्हा का निवडून द्यायचे प्रश्न मतदारा मध्ये निर्माण झाला आहे.