लाडकी बहिण योजना: भंडारा शहरातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक
भंडारा शहरातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक २६ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाध्यक्ष श्री. नानाभाऊ पंचबुध्दे, प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई मदनकर, आणि युवक अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनात पार्टी कार्यालयात आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार (Ajit Pawar)यांनी महिलांसाठी लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेंतर्गत १५०० रुपये महिना मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या योजनेबद्दल आभार मानताना महिलांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत खा. प्रफुल पटेल यांचेही आभार मानले. सर्व महिलांनी बॅनरवर स्वाक्षरी करून या योजनेला पूर्ण पाठिंबा दर्शविला आणि ती पुढील पाच वर्षे सुरु राहावी अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी, सर्व महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, जसे की प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना १०,००० रुपये स्टायपेंड व प्रशिक्षण, तसेच महिलांना व्यवसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षण शुल्कामध्ये १००% सवलत याबद्दल प्रोजेक्टरद्वारे अवगत करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख व्यक्तींमध्ये सौ. रत्नमाला चेटुले, अॅड. नेहा शेंडे, मंजुषा बुरडे, किर्ती गणविर, जयशिला भुरे, वंदना न्यायमुर्ती, आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश होता. मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.