OBC Reservation : भंडारा–गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय, अशासकीय आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी आर्थिक मर्यादा वाढवण्यात आली होती. मात्र, क्रिमी लेयरची अट ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अडथळा ठरत होती. या प्रश्नावर राज्याचे माजी मंत्री आणि ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने आवाज उठवला.
वर्ष 2017-18 मध्ये ही मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली होती, परंतु डॉ. फुके यांनी या अटी रद्द करून नॉन-क्रिमी लेयरची अट लागू करण्याची मागणी केली. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा दिला.(OBC Reservation)
अखेर, डॉ. फुके यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि सरकारने क्रिमी लेयरची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमी लेयरचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या निर्णयामुळे लाखो ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि डॉ. फुके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (OBC Reservation)