महाआघाडीतील सर्व नेते, कार्यकर्ते चरण वाघमारे यांच्या विरोधात एकत्र ,तीन माजी आमदार, दोन खासदार, सात जिल्हा परिषद सदस्य व्यासपिठावर ,तिसरी आघाडी तयार, आणी तिरंगी लढतिचे संकेत
Tumsar Assembly Election 2024 : विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झालेली आहे . मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) उमेदवारी यादी किंवा जागावाटप पूर्ण झाले नाही. भाजपने 99 जागांवर उमेदवार दिलेत. तर राष्ट्रवादीने 18 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा अद्याप संपलेली नाही त्यामुळे जागा कोणाला आणि उमेदवार कोण हा प्रश्न इच्छुकांना पडला आहे.
तुमसर विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या गटा कडे गेली. राष्ट्रवादी पार्टी ने माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांना तुमसर विधानसभेतील कार्यकर्ते यांचा विरोध झुगारून तिकीट जाहीर करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते यांच्यातील असंतोष उफाळून आला. त्याकरिता चिंतन आणि आक्रोश सभेचे व पत्रकार परिषदेचे आयोजन तुमसर येथील राजाराम लान येथे आयोजित केला होता. त्यात जवळपास तीन हजार कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
तीन माजी आमदार, दोन माजी खासदार, सात जिल्हा परिषद सदस्य व्यासपिठावर एकत्र
सभेचे वैशिष्ट म्हणजे तीन माजी आमदार मधुकरजी कुकडे अनिल बावनकर, सेवकभाऊ वाघाये, उपस्थित होते तर दोन माजी खासदार शिशुपालजी पटले व माजी खासदार मधुभाऊ कुकडे उपस्थित होते. त्याच बरोबर जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी, जिप सदस्य एकनाथ फेंडर, देवा इलमे, नरेश ईश्वरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी पार्टी चे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, माजी जिप सदस्य ठाकचंदजी मुंगुसमारे, बळाभाऊ ठाकूर, प्रमोद तितिरमारे, गजानन झंजाड, अमर रगडे व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
१२ पैकी एकाला तिकीट देण्याची मागणी
तुमसर मोहाडी तालुक्यातील महाआघाडील १२ नेत्या पैकी एकाला तिकीट देण्याची सर्व संमतीने निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये प्रथम स्थानी ठाकचंद मुंगुसमारे, शिशुपाल पटले हे आहेत अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे. तुमसर- मोहाडी विधानसभेत तिहेरी लढत होणार असे चित्र साध्य तरी दिसत आहे. ठाकचंद मुंगुसमारे युवा नेता असून त्यांची जनमानसात चांगली व स्वच्छ प्रतिमा आहे. एक मनमिळाऊ व लहानपणा पासून व्यावसाईक दृष्टीकोन असलेला व्यक्तिमत्व आहे. युवा मित्र व कार्यकर्ते मोठी फळी हि त्यांची जमेची बाजू आहे. तर शिशुपालजी पटले हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी खासदार, कृषी बाजार उत्पन्न सभापती अशी अनेक पदे भूषविली आहेत ते शांत व संयमी, जनसमस्या विषयी सदैव तत्पर अशी त्यांची ओळख आहे. या शिवाय मधुभाऊ कुकडे, किरण अतकरी, अनिल बावनकर, रमेश पारधी, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये असे अनेक दिग्गज उमेदवारी साठी इच्छुक आहेत.