महिला सबळीकरण, सस्तीकरणासाठी नानाभाऊ पटोले यांचा धाडसी निर्णय
Bhandara Assembly Election : अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने पहिल्यांदाच महिला उमेदवाराला संधी दिली आहे. जिल्ह्यातील माजी सरपंच सौ. पूजा ठवकर (गजभिये) Pooja Thawakar यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून आज काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे सौ. पूजा ठवकर (गजभिये) Pooja Thawkar या प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले Nana Patole यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
सौ. पूजा ठवकर (गजभिये) ह्या बसपा चे राष्ट्रीय संघटक राजविलास गजभिये यांची पुतणी आहे त्यामुळे बहुजन समाजाचा विचार यांच्या मनात लहानपणा पासूनच रुजला आहे. त्यांना बालपणापासूनच सामाजिक राजकीय कार्यात रुची आहे. त्यांनी सन २०१७ ते २०२२ पर्यंत बेला ग्रामपंचायत चे सरपंच पद भूषविले आहे. त्यांचे शिक्षण बी.ए. स्नातक पर्यंत झालेले आहे. त्यांचा जन्म बौध्द समाजात झाला असून त्यांचे आंतरजातीय विवाह श्री गणेश (बालू) ठवकर यांचेशी झाला आहे. बालू ठवकर हे कुणबी समाजातील आहेत, सामाजिक कामात ते सुद्धा नेहमीच पुढे असतात. हे बौध्द व कुणबी अश्या वेगवेगळ्या समुदायातील असले तरी कौटुंबिक व सामाजिक एकोपा त्यांनी जपला आहे.
प्रथमच एका महिलेला विधानसभेचे प्रतीनिधीत्व देण्याचे धाडसी निर्णय
भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला विधानसभेचे प्रतीनिधीत्व देण्याचे धाडसी निर्णय नानाभाऊ पटोले यांनी घेतले आहे. यांना निवडून आणण्याकरिता भाऊ चा कस लागणार हे मात्र नक्की. नानाभाऊ त्याचेवर संपूर्ण महाराष्ट्राची जबादारी असताना स्वतःला जिल्ह्यातच का अडकवून ठेवण्याची जोखीम का घेतली असा प्रश्न साहजिकच पडतो. परंतु विपरीत परिस्थितीत आश्चर्य जनक, सामान्य माणसाच्या आकलना बाहेरील निर्णय घेऊन पूर्णत्वास नेणार नाही तो नानाभाऊ कसला ! तूर्तास तरी नानाभाऊ च्या निर्णयला सलाम, मनाचा मुजरा कारण भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एका दलित-ओबीसी महिलेला विधानसभेचे प्रतीनिधीत्व करण्याची संधी मिळाली.
जिल्हा कांग्रेस च्या वतीने गांधी चौकात निदर्शने
भंडारा जिल्ह्यात शुद्ध बौद्ध समाजाला तिकीट देण्यात यावी म्हणून अनेक बैठका, पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. जिल्हा कांग्रेस च्या वतीने गांधी चौकात निदर्शने करण्यात आले. या निदर्शनाला चिथवनारा मुस्लीम समाजाचा कांग्रेस प्रदेश सचिव व तिकीट मागणारा जिल्हा महासचिव सोयीस्कर रित्या अनुपस्थित होता.
एक नाव निश्चित होऊन पुढे येऊ शकले नाही
भंडारा जिल्ह्यात राजकीय जातीचे पेव फुटले आहेत. पक्षाची तिकीट मिळविण्या करिता जातीचा आधार घेऊन तिकीट मागितल्या जातात. शुद्ध बौद्ध समाजाला (महार जातीला) तिकीट देण्यात यावे म्हणून मागील एक वर्ष पासून आंबेडकरवादी समाजाच्या बैठका चालू होत्या परंतु त्यातून कोणा एकाला तिकीट द्यावी, कुणाकडे इलेक्टीव्ह मेरीट आहे हेच निश्चित होऊन एक नाव पुढे येऊ शकले नाही. मागील लोकसभा निवडणुकीत तेली समाजाला तिकीट द्यावी म्हणून बैठका सुरु होत्या पण त्यावेळी सुद्धा त्यांना अपयश आले. जातीच्या नावावर तिकीट मागणाऱ्या कडे इलेक्टीव्ह मेरीट नसते म्हणून ते जातीचा आडोसा घेतात. लोकसंख्या जास्त असणाऱ्या जाती निवडणूक उमेदवारी वर आपला दावा सांगतात मग लहान किवा कमी लोकसंख्या असणाऱ्या जातींचे काय ? असा प्रश्न निर्माण होतो.