भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील बीजेपी आता प्रफुल पटेल यांच्या अखत्यारीत
Bhandara Politics : खा. प्रफुल पटेल (Praful Patel) एक मोठे नेते म्हणून देशात ओळखले जातात. पटेल हे मुळचे गुजराती आहेत आणी देशात दोन गुजरातीच सत्ता चालवीत आहेत. सि.जे. हाउस वरील इडी ची कारवाही आणी इंडिअन एअर लाईन्स घोटाळा प्रकरणी सीबीआय कारवाही मुळे शरद पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये फुट पाडून महायुती मध्ये सामील झाले.
प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी मागील लोकसभा २०२४ निवडणुकी मध्ये जनतेत आणी कार्यकर्त्या मध्ये प्रचंड विरोध असलेल्या माजी खासदार सुनील मेंढे याला तिकीट देण्या करिता जीवाचे रान केले. त्याच बरोबर जनतेची नाड जुडलेले, सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावणारे आमदार डॉ. परिणय फुके यांना केलाला विरोध, यामुळे विनाकारण भाजपला भंडारा गोंदिया लोकसभा सिट गमवावी लागली, यामुळे पटेल यांना असुरी आनंदाचा अनुभव घेता आला असावा.
इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या भ्रष्ट नेत्यांच्या मेगा भरती करून क्लीन चीट
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा येतात तुमसर हि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडे देण्यात आली, भंडारा हि शिवसेना शिंदे गट कडे गेली तर साकोली मध्ये पटेल यांनी राष्ट्रवादीच्या जि.प. सदस्याला उमेदवारी दिली यामुळे भंडारा भाजपला ना हक्काचा खासदार राहिला ना आमदार त्यामुळे पटेल यांनी भंडारा जिल्ह्याला भाजप मुक्त केल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. मागील कालखंडात भाजपा खासदार आणी तीन आमदार होते. भंडारा जिल्हा भाजपमय झाला होता. पण सत्तेच्या लालसे मुळे दिल्लीतील भाजप हायकमांड ने इडी, सीबीआय कारवाही चे धाक दाखवत, इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या भ्रष्ट नेत्यांच्या मेगा भरती करून क्लीन चीट दिल्या. त्यातीलच एक प्रफुल पटेल सुद्धा आहेत. परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात तेच आता साईड इफेक्ट भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत.
झेंडे धरण्याची पाळी भाजपा नेत्यांवर, व कार्यकत्यावर
भंडारा विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवाराच्या विरोधात दोन वेळा बंडखोरी केलेल्या नरेंद्र भोन्डेकर यांचा प्रचार करण्याची वेळ आली. तुमसर विधान सभा क्षेत्राचे आमदार राजु कारेमोरे यांचेवर भंडारा जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी धान खरेदी भ्रष्ट्चाराचे अनेक आरोप केले, गुन्हे सुद्धा दाखल केले, मागील विधानसभा त्यांच्या विरोधात लढली आज त्यांचेच झेंडे धरण्याची पाळी भाजपा नेत्यांवर, व कार्यकत्यावर आली. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजपात विद्रोही असंतोष पाहायला मिळत आहे.
डॉ. परिणय फुके यांच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न
साकोली विधान सभा क्षेत्रात राष्ट्रवादी कांग्रेस च्या जिल्हा परिषद सदस्य डॉ. अविनाश ब्राम्हणकर यांना भाजपा चे तिकीट दिले. बीजेपी कडून उमेदवारी करीता इच्छुक अनेक नावे होती त्यामध्ये डॉ. परिणय फुके, बाळा काशिवार, सोमदत्त करंजेकर, प्रकाश बाळबुधे, शिवराम गिर्हेपुजे यांना डावलले. बीजेपी मध्ये अनेक नेते उमेदवारी करिता इच्छुक असतांना राष्ट्रवादी च्या व्यक्तीला भाजपात आणुन तिकीट देणे हे डॉ. परिणय फुके यांच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नेतृत्वाला एक प्रकारे शह देण्यासारखे आहे, असले कुरघोडीचे राजकारण करण्या एवजी लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढे यांना निवडून आणले असते तर पटेल यांची खरी ताकत दिसली असती. अनेक वर्ष ज्यांनी भाजप सोबत काम केले ते नेते, कार्यकर्ते, समर्थक जिल्ह्यातील भाजप परप्रांतीयाच्या हातातील बाहुले बनण्यापासून वाचविण्याकरिता धडपडत आहेत.