Bombay High Court decision मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, बौद्ध समाज अनुसूचित जातीत समाविष्ट नाही. त्यामुळे बौद्ध व्यक्तींना अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (SC/ST Atrocity Act) अंतर्गत संरक्षण मिळणार नाही. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी क्रिमिनल अपील क्र. 112/2020 मधील बालाजी उत्तम बावणे विरुद्ध महाराष्ट्र राज्य Bombay High Court decision या प्रकरणात हा निर्णय दिला आहे.
बौद्ध धर्म अनुसूचित जातीत नाही – न्यायालयाचा निष्कर्ष
High Court न्यायालयाने स्पष्ट केले की बौद्ध हा धर्म आहे आणि त्यामध्ये जात व्यवस्था अस्तित्वात नाही. तसेच, राज्य व केंद्र सरकारच्या अनुसूचित जातींच्या अधिकृत यादीमध्ये “बौद्ध” या जातीचा समावेश नाही. परिणामी, बौद्ध व्यक्तींना अनुसूचित जाती म्हणून मान्यता नाही, आणि त्यांना अट्रासिटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करता येणार नाही.
संविधानिक आधार आणि राष्ट्रपती अधिसूचना
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 अंतर्गत, अनुसूचित जातींची यादी राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार ठरवली जाते. या संदर्भात, कोणत्याही भागात बौद्ध धर्माच्या व्यक्तींना अनुसूचित जात म्हणून अधिसूचित करण्यात आलेले नाही. त्यामुळे बौद्ध धर्मीयांना अनुसूचित जातींच्या कायदेशीर अधिकारांचा लाभ मिळत नाही.
बौद्ध समाजासाठी आरक्षण मागणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
बौद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून बौद्धांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली आहे. सध्या ही याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अनेक बौद्ध समाजातील व्यक्ती धर्मांतरानंतरही मूळ हिंदू जातीच्या लाभाचा फायदा घेत असल्याचे आढळून आले आहे, जे कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचे ठरते.
एकाच वेळी दोन धर्मांचा लाभ घेता येणार नाही
संविधान सभेच्या चर्चांमध्ये असे स्पष्ट करण्यात आले होते की अनुसूचित जाती ही केवळ हिंदू धर्माशी संबंधित आहे. अस्पृश्यता हिंदू समाजातील प्रथा असल्याने, इतर धर्मांत अशा प्रकारची प्रथा अस्तित्वात नाही. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारते, तेव्हा ती अनुसूचित जातीच्या यादीतून वगळली जाते.
राज्य शासनाची यादी आणि परिपत्रक
महाराष्ट्र राज्य शासन निर्णय २६ सप्टेंबर 2008 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, महाराष्ट्र राज्य (क्रमांक सकीर्ण 2008/यादी / प्र. क्र. 553/मावक 5 यानी अनुसूचीत जाती /जामातीची नावें या शासन परिपत्रकमध्ये आहे.या यादीत “बुद्ध” या जातीचे नाव नाही. ही जात अनुसूचित जातीमध्ये येत नसल्याने त्याना अट्रासिटीची तक्रार करता येत नाही.