Dr.Parinay Fuke MLA : भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस आज मोठे यश मिळाले. उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा नेते यांनी आज जाहीरपणे भाजपामध्ये प्रवेश केला.आज बेला भंडारा येथील हॉटेल फ्लेव्हर येथे भाजपा भव्य प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. हा प्रवेश मा. डॉ. परिणय फुके Dr.Parinay Fuke यांच्या प्रभावी नेतृत्वात संपन्न झाला. Dr.Parinay Fuke MLA यांच्या मार्गदर्शनामुळे भाजपात नव्याने सहभागी होणाऱ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला.
भाजपने मागील काही वर्षांत ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, जलसंधारण, कृषी सुधारणा, महिला सक्षमीकरण व युवा संधी यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. हेच कार्य समाजातील अनेक घटकांना भाजपाशी जोडण्यास कारणीभूत ठरत आहे. Dr.Parinay Fuke MLA यांच्या उपस्थितीमध्ये, या विशेष प्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री चैतु उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे, तसेच इतर अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप हा फक्त निवडणुकांसाठीचा पक्ष नसून जनतेशी सतत जोडलेला, सेवाभावी विचारांचा पक्ष आहे, हेच या प्रवेशाने अधोरेखित झाले. या नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे भाजपाचा विस्तार अधिक प्रभावी होणार आहे, असा विश्वास Dr.Parinay Fuke MLA यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.
लाखांदूर तालुक्यातील अर्धवट कॅनल चे काम त्वरित पूर्ण करा आ. फुके यांचे निर्देश
भंडारा–गोसेखुर्द धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी पुढाकार घेतला आहे. नागपूर येथील सिंचन भवनात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. Dr.Parinay Fuke MLA यांनी या बैठकीत पुनर्वसन, कालवा कामे, उपसा सिंचन योजना आणि संपादन विषयक अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
Dr.Parinay Fuke MLA यांनी भंडारा तालुक्यातील खैरी व संगम या गावांतील शेतकऱ्यांची शेती गोसे धरणात गेल्यामुळे ते नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. या बाबतीत तात्काळ तोडगा काढण्याची गरज असल्याचे आमदार फुके यांनी स्पष्ट केले. मोहाडी तालुक्यातील मुंढरी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही बैठकीत मांडण्यात आली. भोजापूर येथील अपूर्वा कॉलनीत बॅक वॉटरमुळे काही घरे धोकादायक स्थितीत आली असून ती संपादित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
कॅनल च्या अपूर्ण कामामुळे संपूर्ण गावामध्ये पाणी
लाखांदूर तालुक्यातील ओपरा, राजनी, डांबेवीरली, गवराळा, मोहरणा, कुडेगाव, विरली/खुर्द या गावांमध्ये डाव्या कालव्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे शेती पाण्यात गेली आहे व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील वर्षी कॅनल च्या अपूर्ण कामामुळे संपूर्ण गावामध्ये पाणी गेल्याने बरेच घरे पाण्यात बुडाली होती, तर बरीच शेती डुबलेली असल्याने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले.त्यामुळे कालव्या चे अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश Dr.Parinay Fuke MLA यांनी अधीकाऱ्यांना दिले.
पिपरी, चिचोली, लोहारा (मौदा तालुका), भंडारा व मोहाडी तालुक्यातील एकूण ७० गावांसाठी कन्हान नदीवरील गोसे प्रकल्पाच्या थांबलेल्या पाण्यावरून उपसा सिंचन योजना राबवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे या गावांमध्ये शेतीला पाणी मिळू शकेल. तसेच मुख्य कालव्यालगतच्या आथली, आसोला, परसोडी (नाग), कुडेगाव, खैरी (पट), गवराळा, मांदेड, सावरगाव आदी गावांमध्ये लहान पाटचऱ्यांचे काम पूर्ण करावे, अशी सूचना झाली. गोसे प्रकल्पातील गट क्रमांक २०५/३ मधील ९२८.३१ चौ. मीटर आणि गट क्रमांक २४१ मधील अकृषिक जमिनी संपादित करण्याचे प्रस्तावही शासनाकडे आहेत. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन आमदार फुके Dr.Parinay Fuke यांनी दिले. लाखांदूर तालुक्यातील ओपारा बागडी व इतर गावांमध्ये कॅनलची अपूर्ण काम असल्याने धारगाव उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देऊन भंडारा जिल्ह्यातील ४९ गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी बैठकीत झाली.