Atrocities on Hindus in Bangladesh should be stopped: Kha. Dr. Prashant Padole खासदार प्रशांत पडोळे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
Hindus in Bangladesh : बांगलादेशातील अराजक परिस्थितीमुळे तिथे राहणाऱ्या हिंदूंवर अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णायक भूमिका घ्यावी, अशी विनंती भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली आहे.
बांगलादेशात राहणारे हिंदू बांधव भयभीत
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना। भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी लेखी पत्र पाठविले आहे. बांगलादेशात राहणारे हिंदू बांधवांसह तेथील मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत. त्यांनी बांगलादेशात राहणाऱ्या हिंदू बांधव भयभीत झाले असून तेथील सरकारही हिंदू बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करतांना मात्र दिसत नाहीत. त्यामुळे अनेक हिंदू बांधव अजूनही बेघर असून कित्येक बांधव बेपत्ता असल्याची स्थिती समोर येत आहे. बांगलादेशात अनेक हिंदू बांधव आणि महिलांवर अत्याचारासह हत्या आणि अनेक अघटीत घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आता पुढाकार घेऊन हिंदू बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जागतिक पातळीवरून तेथील बांधवांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. Hindus in Bangladesh
भारतीयांमध्ये बांगलादेश प्रति आक्रोश Hindus in Bangladesh
बांगलादेशातील हिंदू बांधवांचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये बांगलादेश प्रति आक्रोश निर्माण झालेला आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेला अन्याय हा विषय सुसंस्कृत भारत देशासाठी चिंतेचा ठरला आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भारताने तातडीने कडक उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी, अशी मागणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी केली आहे.
खा.डॉ. प्रशांत पडोळे यांची प्रतिक्रीया
@ हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यावा
@ बांगलादेशात हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहे. अनेक नागरिक अजूनही बेपत्ता असून कित्येकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अशावेळी भारत सरकारने जागतिक स्तरावर हा मुद्दा उपस्थित करून हिंदू बांधवांना सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने बांगलादेश सरकारवर दबाव आणून कडक उपाययोजना कराव्यात. Hindus in Bangladesh
डॉ. प्रशांत पडोळे
खासदार भंडारा-गोंदिया क्षेत्र