Suresh Dhas सुरेश धसांचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ
Mahadev App Scam बीड जिल्ह्यात महादेव अॅपच्या माध्यमातून मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात राजकीय AAKA हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी ईडी ED मार्फत करण्याची मागणी करत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे.
महादेव बेटिंग अॅप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, आणि याचा बीड जिल्ह्यातील राजकीय संबंध असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. परळीतील एका व्यक्तीच्या नावावरून या अॅपच्या माध्यमातून तब्बल 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा धस यांनी आरोप केला आहे. या प्रकरणात दोन पोलिसांचा सहभाग असल्याचेही उघड झाले आहे. बीडमधील Mahadev App Scam या घोटाळ्याचा सखोल तपास केल्यास त्याचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत पोहोचतील, असेही धस यांनी नमूद केले आहे.
बीडमधील कोणतेही प्रकरण पाहिल्यास त्यामागे एकच राजकीय आकाचा हात
भाजप आमदार सुरेश धस यांनी या घोटाळ्याचा संपूर्ण तपास होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी बीडमधील कोणतेही प्रकरण पाहिल्यास त्यामागे नेहमीच एकच राजकीय आकाचा हात असल्याचा दावा केला आहे. या आकांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दबाव टाकून शेतजमिनी खरेदी केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर, महादेव अॅप Mahadev App Scam घोटाळ्यामागेही हाच आका असल्याचा धस यांचा ठाम आरोप आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आधीच आक्रमक झालेले धस यांनी महादेव बेटिंग अॅप Mahadev App Scam घोटाळ्याचा मुद्दा उचलल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या गंभीर आरोपांवर सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महादेव बेटिंग ॲपवर केंद्र सरकारने घातली बंदी
5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप प्रकरण तेव्हा चर्चेत आले जेव्हा ईडीने ‘कॅश कुरिअर’चे ईमेल स्टेटमेंट रेकॉर्ड केल्याचा दावा केला ज्याने उघड केले की छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यूएई-आधारित ॲप प्रवर्तकांकडून कथितपणे 508 कोटी रुपये घेतले होते घेतले होते. मात्र, बघेल यांनी आरोप फेटाळून लावले.
ईडीने ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा केला दाखल
8 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर फसवणूक आणि जुगार खेळल्याचा आरोप होता. या प्रकरणी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यासह ३० हून अधिक जणांवर माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, जो नंतर मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता आणि नंतर तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. वास्तविक, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये ॲप आणि त्याचे प्रवर्तकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास सांगितले होते. सौरभ, रवी आदींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एफआयआरनुसार, आरोपींनी लोकांची सुमारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.