विद्यार्थिनी व पालकांच्या आंदोलनामुळे प्रकरण आले उघडकीस
Principal demanded physical pleasure भंडारा येथील शासकीय नर्सिंग ANM, GNM कॉलेज मध्ये मार्क वाढवून देण्याच्या मोबदल्यात विद्यार्थिनीं सोबत लैंगिक सुखाची मागणी करण्याचा प्रकार समोर आला. सदर गंभीर प्रकरणी पालक व विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आरोपी प्राचार किरण मुरकुट यांस पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनींना मार्क वाढवून देण्याच्या नावावर त्यांना शारीरिक सुखासाठी अनेकदा मागणी करण्यात आली होती. या संदर्भात आरोपी प्राचार्य किरण मुरकुट हा पीडित विद्यार्थिनींना व्हाट्सअप वर मेसेज पाठवत होता. Principal demanded physical pleasure विद्यार्थिनींना वारंवार लैंगिक सुखाची मागणी करण्यात येत होती. पीडित विद्यार्थिनींनी त्रासून सदर बाब आपल्या पालकांना सांगितली. या प्रकारामुळे काही सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते यांनी एकत्र येत गंभीर प्रकारास वाचा फोडली.
प्राचार्य किरण मुरकुट यास पालकांनी अश्लील मेसेज संदर्भात विचारला जाब
आरोपी लिंग पिसाट प्राचार्य किरण मुरकुट यास पालकांनी अश्लील मेसेज संदर्भात जाब विचारला. प्राचार्य किरण मुरकुट याने उडवा उडवी ची उत्तरे दिली. यामुळे पालक व सामाजिक कार्यकर्ते यांनी आक्रोश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांना प्राचारण करण्यात आले. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे बघता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल टेंभुर्णे हे सुद्धा शासकीय नर्सिंग कॉलेज मध्ये दाखल झाले. त्यांच्या समक्ष विद्यार्थिनींनी आपल्यावर घडलेल्या घटनेचे माहिती दिली. यावेळी पालक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हा प्रकार शासकीय नर्सिंग कॉलेज मध्ये अनेक वर्षापासून सुरू
पीडित विद्यार्थिनींनी सांगितले की, हा प्रकार ह्या महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आरोपी प्राचार्य किरण मुरकुट हा विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळेस अश्लील मेसेज पाठवायचा. व त्यांना कपडे काढून मला तसे फोटो पाठवा, तुम्हाला प्रॅक्टिकल चे पूर्ण मार्क देतो असे म्हणत होता. परीक्षेत पास व्हायचे असेल तर माझ्यासोबत फिरायला बाहेर चला. तुम्हाला सगळं काही समजते. तुम्ही लहान नाही आहात. असे संदेश वारंवार व्हॉट्सॲप वर पाठवत होता. अनेक विद्यार्थिनींनी रडून आपल्या भावना प्रकट केल्या.
गंभीर बाब म्हणजे ज्या विद्यार्थिनी नापास झालेलल्या आहेत. अशा विद्यार्थिनींना सुद्धा सुट्टी न देता प्राचार्य किरण मुरकुट हा महाविद्यालयातच निवासी ठेवत असे. त्यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी देत नव्हता. काही पालकांनी सांगितले की विद्यार्थिनीचां नर्सिंग कोर्स संपून एक वर्ष झाला आहे. तरी सुद्धा प्राचार्य किरण मुरकुट हा विद्यार्थिनींना सुट्टी देत नव्हता. व जबरदस्ती विद्यार्थिनींना महाविद्यालयातील होस्टेलमध्येच राहण्यास भाग पाडत होता.
महाराष्ट्रा मध्येच लाडक्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकार
अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की प्राचार्य किरण मुरकुट याने अनेक विद्यार्थिनींच्या शारीरिक छळ केलेला आहे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रा मध्येच लाडक्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकार समोर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच असा असा गंभीर प्रकार घडणे ही एक फार मोठी शोकांतिका आहे विद्यार्थिनी व पालकांनी सदर गंभीर प्रकरणाची चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय मंत्रालयाने तसेच गृह मंत्रालयाने वरिष्ठ व अनुभवी महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी कमिटी स्थापन करावी. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे बयान घेण्यात यावे. लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये फार मोठे रॅकेट कार्यरत आहे. पुन्हा अनेक आरोपी ह्या गैर प्रकारात सहभागी आहेत. ह्या सर्व बाबीचा भांडाफोड करावा.अशी मागणी करण्यात येत आहे.
सुरक्षेसाठी महिला सुरक्षा कर्मीची नियुक्ती झालेली नाही
भंडाऱ्यातील प्रकरण हे शिक्षण क्षेत्रावर गालबोट लावणारे आहे. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये नर्सिंग कॉलेज च्या अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. महाविद्यालयात एक सुद्धा कॅमेरा लावण्यात आलेला नव्हता. सुरक्षेसाठी कुठेही महिला सुरक्षा कर्मीची नियुक्ती झालेली नव्हती. विशेष बाब म्हणजे महिला परिचर्या महाविद्यालय असताना पुरुष वार्डन ची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. ही फार मोठी गंभीर बाब निदर्शनास आलेली आहे. शासकीय परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी वरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी किरण मुरकुट यास सेवेतून कायमचे बडतर्फ करून त्याला भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला कायमचे गजाड करावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच इतर दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही ची मागणी करण्यात येत आहे. अशा दोषी लिंग पिसाट प्राचार्यावर कठोर कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळात भंडारा येथे भीषण आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या घटने वेळी, नागपूर विद्यापीठ चे माजी सीनेट सदस्य प्रविन उदापुरे, सामाजिक कार्यकर्ते, बालु ठवकर, अजय मेश्राम, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पवन वंजारी, सतिश सार्वे, अजित बन्सोड, राधेय भोंगाडे, आकाश ठवकर, रुपेश मारवाडे, उमेश मोहतुरे, पन्ना सारवे, विनीत देशपाडे, मयूर सूर्यवंशी, जयंता बोटकुले, अमोल लांजेवार, मनोज लुटे यांसह मोठ्या संख्येत पालक व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.