Sakoli Assembly Election 2024 : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा फार्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस ४ नवंबर आहे. किती उमेदवार उमेदवारी घेतात व जातीचा समीकरणे जुळवून निवडणुकीची रणनीती आखली जाईल.
जिल्ह्यात दोन प्रफुल पटेल (praful Patel) आणी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले (Nana Patole) हे दोन हेवीवेट नेते मानले जातात. प्रफुल पटेल हे अल्पसंख्यांक गुजराती समजाचे आहे. त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोकांना आपसात लढवत ठेवणे त्यांना आवश्यक आहे जेणे करून राजकीय खेळ्या करता येतील. पटेल स्वतः ला विकास पुरुष म्हणवून घेतात मोठ-मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून गाजावाजा करतात. त्याच्या फायदा राजकीय पोळी शेकून घेण्याच्या प्रयत्नांत नेहमीच असतात. तुमसर देव्हाडा येथील साखर कारखाना बुडवून विकला, साकोली येथील भेल प्रकल्प Bhel Project)अपूर्ण अवस्थेत आहे. लाखांदूर येथील ग्रोवर साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. विडीओकान कारखांना सुरूच होऊ शकला नाही. संफ्लाग, अशोक लेल्यांड कारखान्याला गळती लागलेली आहे. गोंदिया शिक्षण संस्थेत पद भरती करताना ६० लक्ष रुपये घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे स्वतःला पटेल यांनी विकास पुरुष म्हणून घेणे निरर्थक वाटते.
भाजपा चे अनेक नेते निवडणूक लढण्यास इच्छुक पण बाहेरच्याला संधी
साकोली विधानसभा क्षेत्रात भाजपा चे अनेक नेते निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु त्यांना डावलून राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य डॉ. अविनाश ब्राम्हणकर यांना भाजपच्या तिकीटवर उमेदवारी दिली. ब्राम्हणकर हे झाडे कुणबी आहेत आणी नानाभाऊ पटोले सुद्धा झाडे कुणबी आहेत त्यामुळे कुणबी समाजाच्या मता मध्ये फुट पडेल. त्याचं बरोबर भाजपा मधील निष्ठावंत पक्षा पासून दूर जातील व भाजपा कमजोर होऊन त्याचं फायदा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत होईल अशी दुहेरी खेळी करण्याचा प्रयत्न पटेल यांनी केला. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्या विरोधात जनमत असताना डॉ. परिणय फुके यांना डावलून सुनील मेंढे यांना तिकीट दिली आणी पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी सुद्धा पटेल यांनी सुनील मेंढे च्या उमेदवारी चा हट्ट धरला होता.
शिखंडी म्हणून अविनाश ब्राम्हणकर यांचा वापर
अविनाश ब्राम्हणकर यांना पुढे करून त्याचा आडून नाना पटोले यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची पटेल यांनी योजना आखली आहे. अविनाश ब्राम्हणकर हे झाडे कुणबी असल्यामुळे त्यांची मते विभागली जातील. राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य डॉ.अविनाश ब्राम्हणकर यांना भाजपच्या तिकीटवर उमेदवारी दिली परंतु तिकीट साठी इच्छुक डॉ. परिणय फुके, (Parinay Fuke) माजी आमदार बाळा काशीवार, सोमदत्त कुरंजेकर, शिवराम गिर्हेपुंजे, प्रकाश बाळबुधे कमालीचे नाराज असल्याचे चित्र आहे.
काय आहे शिखंडी महाभारत या महाकाव्यातील पात्र
पितामह भीष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला. (भीष्माने अंबेशी लग्न करण्यास नकार दिला होता.) शिखंडी हा तृतीयपंथी असून शिखंडीच्या रूपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भीष्माचार्यांना अवगत होते. महाभारत युद्धात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहिले नाही किंवा त्यावर शरसंधानही केले नाही. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारून पितामह भीष्म यांना रणभूमीत बाणांच्या शय्येवर पाडले. या घटनेमुळे महाभारताच्या युद्धाला वेगळी कलाटणी मिळाली.