Bhandara vidhansabha Election 2024 : साकोली विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पार्टी कडून प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले हे निवडणुकीच्या रिंगणात असतील हे निश्चित आहे. आता नानाभाऊ पटोले विरुद्ध तगडा उमेदवार देणे भाजपला क्रमपात्र आहे. साकोलीत नानाभाऊ ला कडवी झुंज देण्याची क्षमता फक्त भाजपच्या आमदार डॉ. परिणयजी फुकें मध्ये आहे. पण ते नुकतेच विधानपरिषदेवर गेले आहेत. ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या मनस्थितीत मुळीच नाहीत. त्यामुळे भाजपने साकोलीत आपली वेगळी रणनीती आखली आहे. महायुतीत भाजपने आपली हक्काची साकोलीची जागा अजित पवार गटाला देण्याचे ठरविल्याचे सूत्रांकडून कळते आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत साकोलीत भाजपचे लोक राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहेत. म्हणजे भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा आहेत. तुमसर विधानसभा ही विद्यमान आमदार राजूभाऊ कारेमोरे यांना निश्चित झाली आहे. आता साकोली विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस ला जाणार आणि भंडारा विधानसभा शिवसेना शिंदे गट किंवा आठवले आरपीआय गटाला गेल्यास भाजप जिल्ह्यातून निवडणुकी आधीच शून्य होईल. त्यामुळे “तेल गेले तूप गेले हाती धुपाटने राहिले” अशी अवस्था भाजपा ची होईल.
जाती-जाती अंतर्गत भांडणे लावणे परप्रांतीयांचा जुना छंद
परप्रांतीय लोक आपले व्यवसाय किंवा राजकारणाचा जम बसविण्याकरिता स्थानिक लोकांत फुट पाडण्याचे काम नेहमीच करीत असतात. स्थानिकातील जनतेतील आपसातील मतभेद याचा फायदा उठवून चिथवण्याचे कट कारस्थान नेहमीच चालू असतात. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्यातीलच आमदार पालकमंत्री का बनविल्या जात नाही याचा विचार जनतेने करणे गरजेचे आहे. ज्या कांग्रेस पार्टी त्यांना ओळख दिली, सत्ता दिली त्याचे होऊ शकले नाही. किवा ज्या शरद पवारांनी सतत निवडणुकीत पडत असताना केंद्रीय मंत्री बनविले त्यांचे होऊ शकले नाहीत ते तुमचे आमचे काय होतील असा सहज प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
नानाभाऊ पटोलेंना शह देण्यासाठी परप्रांतीय नेत्यानी कंबर कसली
साकोली या मतदारसंघाच्या निवडणुकीत कुणबी समीकरणही महत्त्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाने भाजपमधून आयात केलेल्या अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्याच्या हाताला घड्याळ बांधली आहे. त्याला निवडणुकीत उतरवून नानाभाऊ पटोलेंना शह देण्यासाठी परप्रांतीय नेत्यानी कंबर कसली असल्याचे विश्वनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे. नानाभाऊ पटोले व अविनाश ब्राम्हणकर हे एकाच जातीचे म्हणजे दोन्ही झाडे कुणबी आहेत हे विशेष. ब्राम्हणकर यांची आर्थिक स्थिती तशी विधानसभा निवडणूक उमेदवारी दृष्टीने कमकुवतच आहे. त्यांना ब्यानर, पोस्टर करिता अडव्हांस १५ लाख दिल्याची चर्चा जनतेत आहे. परंतु नानाभाऊ पटोलेंच्या तुलनेत हा जिल्हा परिषद सदस्य अतिशय कमकुवत असल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळे नानांभाऊ च्या विरोधात कमकुवत उमेदवार देऊन हे परप्रांतीय महाशय काय साध्य करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.