एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही
ShivSena cabinet Minister : महायुती सरकाराचा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा पार पडला आहे. तत्पूर्वी महायुीतमधील एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. मंत्रिपदाचे दिलेले वचन पाळले नसल्याने भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघातील आमदार नरेंद्र भोंडेकर Narendra Bhondekar यांनी शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी शपथविधी सोहळ्या वेळीच राजीनामा दिल्याने शिवसेनेतील नाराजी नाट्य लपून राहिले नाही.
राजीनामा दिल्याने त्यांची नाराजी उघड ShivSena cabinet Minister
ShivSena cabinet Minister महाराष्ट्रातील महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. अधिवेशनाच्या एक दिवसपूर्वी नागपूरमध्ये महायुतीमधील मंत्रिपदाचा शपथविधी झाला आहे. यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय. शिवसेनेचे (Shivsena) आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी हा राजीनामा दिला. शपथविधीच्या दिवशीच भोंडेकर यांनी नसून, त्यावर चर्चा सुरू झाली आहे. भोंडेकर विधानसभा निवडणुकीत 1 लाख 26 हजार 516 मते घेऊन विजयी झाले आहे.
भोंडेकर यांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा ShivSena cabinet Minister
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेले भोंडेकर यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. भोंडेकर यांच्या आक्रमकपणामुळे शिवसेनेतील नाराजी उघड झाली आहे.
तिघांना डिच्चू, तर 11 जणांना मंत्रीपद
मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला 11 मंत्रिपदे आली आहेत. यात तीन माजी मंत्र्यांना डिच्चू देण्यात आला आहे. यात दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच उदय सांमत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भूसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट यांना मंत्रिपदावर संधी मिळाली आहे.
मंत्रिमंडळात लागली ‘या’ आमदारांची वर्णी ShivSena cabinet Minister
मंत्रिपदाची शपथ घेतलेले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते
संजय शिरसाट
उदय सामंत
शंभूराजे देसाई
गुलाबराव पाटील
भरत गोगावले
संजय राठोड
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक
योगेश कदम
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
भाजप नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
चंद्रशेखर बावनकुळे
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
जयकुमार रावल
पंकज भोयर
राधाकृष्ण विखे पाटील
मंगल प्रभात लोढा
शिवेंद्रराजे भोसले
मेघना बोर्डीकर
नितेश राणे
माधुरी पिसाळ
गणेश नाईक
आशिष शेलार
संजय सावकारे
आकाश फुंडकर
जयकुमार गोरे
अतुल सावे
अशोक उईके